या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते. मात्र काही कारणामुळे ते येऊ शकले नाही.
प्रमोद पाटील, प्रतिनिधी नवी मुंबई, 30 जानेवारी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्याच्या शब्दाला नेहमी मान देत असतात. कोणत्या कार्यक्रमाला ते येता म्हटलं तर येतातच. पण, राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाची रुपरेखा आधीच ठरलेली असते. अशातच नवी मुंबईला हळदी कुंकू कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे न आल्यामुळे माजी नगरसेवक कमालीचे नाराज झाले. नवी मुंबईतील तुर्भे येथे बाळासाहेबांची शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्या माध्यमातून हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते. मात्र काही कारणामुळे ते येऊ शकले नाही. रविवारी मुख्यमंत्री हे औरंगाबादेत होते. (‘सावित्री झाल्या आता जोतिबा..’ चित्रा वाघ यांच्याकडून चंद्रकांत पाटलांची महात्मा फुलेंशी तुलना; म्हणाल्या..) अचानक ठरलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे न आल्यामुळे सुरेश कुलकर्णी हे नाराज झाल्याचे दिसले,तर आपल्या अनेक कार्यकर्त्यांची कामे होत नसल्यानंही आपण नाराज असल्याचे सांगून त्यांनी खंत व्यक्त केली. (‘तुका म्हणे ऐशा नरा मोजूनी माराव्या..’ बागेश्वर बाबाच्या वक्तव्यावरुन रोहीत पवार यांचा थेट CM वर) या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग असताना मुख्यमंत्र्यांनी भेट द्यावी अशी आग्रही भूमिका होती. मात्र मुख्यमंत्री आलेच नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री नवी मुंबईतील अनेक नगरसेवक जे त्यांच्या सोबत गेले आहेत. त्यांना वेळ देत नसल्याने नाराज असल्याचे बोलले जात असून आज त्याची प्रचिती सुरेश कुलकर्णी यांच्या उघड नाराजीने समोर आल्याचे दिसून आले.