JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्याची राज ठाकरेंची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मान्य, मनसेकडून खास Tweet करुन निर्णयाचे स्वागत

सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्याची राज ठाकरेंची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मान्य, मनसेकडून खास Tweet करुन निर्णयाचे स्वागत

येत्या 15 ऑगस्टपासून लोकल (Mumbai Local Train) सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी केली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 09 ऑगस्ट: येत्या 15 ऑगस्टपासून लोकल (Mumbai Local Train) सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी केली. कोरोना लशीचे 2 डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलमधून प्रवास करता येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या या निर्णयाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (Maharashtra Navnirman Sena) स्वागत केलं आहे. यासंदर्भात मनसेनं खास ट्वीट (Tweet) केलं आहे. मनसेनं काय म्हटलं मुंबईकरांचे हाल थांबवण्यासाठी तसंच मुंबईचं अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी ज्यांनी लसीच्या दोन मात्रा घेतल्या आहेत, त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी अत्यंत आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. आज जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येईल ही घोषणा केली. जनभावनेचा आदर करत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करत आहे.

मनसेनं पत्राद्वारे केली होती मागणी सर्वसामान्यांना लोकल प्रवास सुरु करावा, यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. या पत्राद्वारे त्यांनी सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्याची मागणी केली होती.

युरिक अ‍ॅसिडच्या त्रासात वापरा ‘हे’ गोड औषध; संपेल सगळा त्रास; संशोधकांचा दावा

15 ऑगस्टपासून लोकल प्रवास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी लोकल सुरू करण्याबद्दल खुलासा केला आहे. मुंबईमध्ये लोकल प्रवास 15 ऑगस्टपासून करता येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहे. त्यांना १४ दिवसपूर्ण झाले आहे. त्यांना हा प्रवास करता येणार आहे. या सर्व नागरिकांसाठी एक अॅप तयार केला आहे, या अॅपवर नोंदणी करावी लागणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तसंच, कोविड काळामध्ये मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यासाठी निर्बंध टाकण्यात आले आहेत. यासंदर्भात अनेक प्रवासी संघटना तसेच नागरिकांनी वारंवार लोकल सेवा वापरण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. आपणा सर्वास माहितच आहे की अद्याप आपण दुसऱ्या लाटेतून देखील पूर्णपणे सावरलेलो नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका देखील आहे. केंद्र सरकारने देखील आपणास वारंवार याबाबत इशारा दिला आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या