JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / विठ्ठलाच्या भेटीला 'एकनाथ', पहिल्यांदाच शिंदेंना मान, शिवसेनेचाच मुख्यमंत्री करणार पूजा!

विठ्ठलाच्या भेटीला 'एकनाथ', पहिल्यांदाच शिंदेंना मान, शिवसेनेचाच मुख्यमंत्री करणार पूजा!

गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडणाऱ्या घडामोडींमुळे विठ्ठल रखुमाईची पूजा कोण करणार अशी शक्यता निर्माण झाली होती.

जाहिरात

गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडणाऱ्या घडामोडींमुळे विठ्ठल रखुमाईची पूजा कोण करणार अशी शक्यता निर्माण झाली होती.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, ०५ जुलै - महाराष्ट्रात अभुतपूर्व अशा राजकीय नाट्यानंतर अखेरीस मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे (cm eknath shinde) विराजमान झाले आहे. एकनाथ शिंदे सरकार आता पूर्ण बहुमताच्या जोरावर कामाला लागले आहे. आता आषाढी एकादशीला (pandharpur ashadhi ekadashi 2022) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विठ्ठल रखुमाईची (vitthal rukmini mahapuja) महापूजा करणार आहे. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदेंना आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच महापूजेचा बहुमान मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडणाऱ्या घडामोडींमुळे विठ्ठल रखुमाईची पूजा कोण करणार अशी शक्यता निर्माण झाली होती. पण, अखेरीस हा मान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे आता शासकीय आणि प्रशासकीय कार्यक्रमांना वेग आला आहे. महापूजेचं निमंत्रण देण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष आमंत्रण देण्यासाठी पोहोचले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईची महापूजा पार पडणार आहे. ( बँकांमध्ये नोटांची होणार फिटनेस टेस्ट, कोणत्या नोटा बाद केल्या जाणार? ) विणा, विठ्ठल रखुमाईंचा फोटो, तुळसी माळी आणि टोपी घेवून समिती सदस्य मुख्यमंत्री निवासस्थानी दाखल झाले आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर हे पोहोचले आहे. १० जुलैला आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सहपत्नीक पूजा केली जाणार आहे. ( नोकरदारांनो सावधान! मुंबईत 4 च्या सुमारास येणार मोठी भरती ) विशेष म्हणजे, मुख्यमंत्री म्हणून आपल्या शेवटच्या भाषणातही उद्धव ठाकरे यांनी वारकरी आपणास महापूजेला येण्याबाबत विचारणा करत असल्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीतर्फे मुंबईत जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महापूजेचे निमंत्रण दिले होते. पण त्यानंतर शिंदे यांनी बंड पुकारला आणि देवेंद्र फडणवीस हे महापूजा करतील अशी शक्यता निर्माण झाली होती. पण अचानक मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव आलं आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री आता विठ्ठल रखुमाईची पूजा करणार आहे. सर्वाधिक वेळा मान विलासराव देशमुखांना! आजपर्यंत सर्वाधिक वेळा या शासकीय महापूजेचा मान काँग्रेसचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मिळाला आहे. विलासराव देशमुख यांनी एकूण ६ वेळा महापूजा केली. त्यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येकी चार वेळा हा शासकीय महापूजेचा मान मिळाला आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे पायी आषाढी वारी होऊ शकली नाही. त्यामुळे लाखो वारकरी पंढरपूरला जाऊ शकले नव्हते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना वारकऱ्यांशिवाय ही महापूजा करावी लागली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या