JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / भीषण अपघात: बसवर आदळली भरधाव कार, बड्या उद्योगपतीचा मुलगा जागेवरच ठार

भीषण अपघात: बसवर आदळली भरधाव कार, बड्या उद्योगपतीचा मुलगा जागेवरच ठार

लॉकडाऊनमध्ये काळात मित्रांसोबत कारमध्ये फिरायला आलेल्या एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 मे: कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत कठोर लॉकडाऊन आहे. तरी काही लोक लॉकडाऊनमध्येही घराबाहेर पडत आहे. अशातच मुंबईत एक मोठी दुर्घटना घडली आहे. लॉकडाऊनमध्ये काळात मित्रांसोबत कारमध्ये फिरायला आलेल्या एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. उभ्या असेलल्या बसवर भरधाव कार आदळून झालेल्या भीषण अपघातात मुंबईतील एका बड्या उद्योगपतीच्या मुलाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. मरीन ड्राईव्ह भागात मंगळवारी ही दुर्घटना घडली. हेही वाचा..  भीषण अपघातात डॉक्टर पत्नीसह पती जागीच ठार, मुलाला आणण्यासाठी निघालं होतं दाम्पत्य याबाबत मिळालेली माहिती अशी की, आर्यमान नागपाल (वय-18, रा. नेपियन्सी रोड) असं अपघातात मृत्यु झालेल्या तरुणाचं नाव आहे. आर्यमान हा मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक आणि उद्योगपती राजेश नागपाल यांचा मुलगा होता. आर्यमान हा त्याचा मित्र शौर्यसिंग जैन (वय- 19, रा. कफ परेड) आणि वेदांत पाटोदिया याच्यासोबत मरीन ड्राईव्ह चौपाटीवर भटकंती करण्यासाठी आला होता. शौर्यसिंग हा कार चालवत होता तर आर्यमान त्याच्या शेजारी तर वेदांत मागील सीटवर बसला होता.

संबंधित बातम्या

कार उड्डाणपुलापासून सुमारे 100 मीटर अंतरावर आली असता उभ्या असलेल्या बसवर आदळली. धडक एवढी भीषण होती की, आर्यमानचा जागेवरच मृत्यू झाला. तर शौर्यसिंग आणि वेदांत जखमी झाले आहे. शौर्यसिंग याला हरकिशन दास रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. हेही वाचा… PM CARE फंडसाठी एवढी जाहिरात कशासाठी? 20 लाख कोटींच पॅकेज देणाऱ्या मोदींना सवाल या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी भरधाव आणि निष्काळजीपणाने वाहन चालवणे या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अपघातग्रस्त कार शौर्यसिंगच्या मामाची असल्याची माहिती समोर आली आहे. आर्यमानचे वडील मोठे उद्योगपती असल्याचीही माहिती मिळाली आहे. पोलिस सीसीटीव्ही फूटेज शोधून अधिक तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या