मुंबई, 27 मे: मुंबईत एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असताना मुंबई पालिके (civic body) नं शहरातील ऑक्सिजन रिफिलिंग प्लांट्स (oxygen refilling plant) स्थापित करण्याच्या योजनेचं प्रमाण कमी केलं आहे. मुंबईत कोविड-19 च्या रुग्णांचा आकडा सतत वाढत होता. त्यावेळी रुग्णालयांना ऑक्सिजनचा अखंडित पुरवठा व्हावा यासाठी दोन प्लांट्स उभारण्याची योजना महापालिकेकडून आखण्यात आली होती. मात्र आता कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानं महालक्ष्मी येथे केवळ एक प्लांट बांधण्याचं ठरलं आहे. ऑक्सिजन रिफिलिंग प्लांट्चं काम सुरु झाल्याचं मुंबई महापालिके (BMC)कडून सांगण्यात आलं आहे. मात्र अद्याप Petroleum and Explosives Safety Organisation (PESO) कडून मंजुरी आली असून येत्या आठवड्याभरात ते येणं अपेक्षित असल्याचं बीएमसीनं म्हटलं आहे. लवकरच हा प्रकल्प सुरू होण्याची अपेक्षा आहे. हेही वाचा- कोरोना लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारचा नवा निर्णय, वाचा सविस्तर बीएमसीच्या एक बाब निदर्शनास आली की, ऑक्सिजनचे ड्युरा सिलेंडर्स हे जम्बो सिलेंडर्सपेक्षा जास्त काळ टिकतात, ही बाब बीएमसीच्या निदर्शनास आल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं. पुढे अधिकाऱ्यांनी म्हटलं, बीएमसी दोन्ही प्लांटवर एकत्रितपणे काम करु शकत नाही. सध्या कोविड- 19 च्या रुग्णांचा आकडा कमी झाला आहे. त्यामुळे सध्या एक प्लांटवर काम करण्याचं ठरवलं आहे. हेही वाचा- पुणेः शिवसेना सभापतीची गुंडगिरी, गोळीबार करत महिलांना मारहाण PESO चे अधिकारी प्लांटची तपासणी करण्याची शक्यता आहे. त्यानंतर रिफिलिंग प्लांटमध्ये गॅस हस्तांतरित करण्यात येईल असं बीएमसीचेअधिकारी म्हणालेत. हा प्रकल्प ड्युरा सिलेंडर्सवर केंद्रित असेल जो प्रामुख्याने विविध रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनयुक्त बेडसाठी वापरला जातो. दरम्यान उभ्या ऑक्सिजन साठवणीच्या टाक्या आणि जम्बो सिलेंडर्सचा वापर सुरूच असेल. कारण त्याचा सामान्यत: रुग्णालयातील आयसीयूमध्ये वापर केला जातो, असं बीएमसीच्या अधिकाऱ्यानं म्हटलं आहे.