JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मुख्यमंत्रीच तयार करणार शिवसेनेचीही 'यादी', उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने सगळ्यांनाच धक्का!

मुख्यमंत्रीच तयार करणार शिवसेनेचीही 'यादी', उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने सगळ्यांनाच धक्का!

शिवसेना 50:50 च्या फॉर्म्युल्यावर ठाम असल्याचंही बोललं जात होत. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा खुलासा केलाय.

जाहिरात

Pandharpur: Shiv Sena chief Uddhav Thackeray addreses a party rally at Pandharpur in Maharashtra, Monday, Dec 24, 2018. (PTI Photo) (PTI12_24_2018_000135B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 13 सप्टेंबर :  विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्यता असताना सगळ्यांना उत्सुकता आहे ती ‘युती’च्या जागावाटपाची. ‘युती’ होणार हे आता सगळ्यांनीच मान्य केल्यानं जागावाटपाचं काय होणार? कोण मोठा भाऊ? कोण छोटा भाऊ? याची चर्चा जोरात सुरू आहे. दोन्ही पक्षांमधले ज्येष्ठ नेते चर्चेच्या फेऱ्या करताहेत. मित्र पक्षांना 18 जागा सोडण्याचं मान्य झालंय. शिवसेना 50:50 च्या फॉर्म्युल्यावर ठाम असल्याचंही बोललं जात होत. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून लवकरच ‘युती’च्या जागावटपाची घोषणा होईल अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. राष्ट्रवादीचे माजी प्रेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी आज मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश घेतला. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमानंतर उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, यावेळी मी थोडी वेगळी पद्धत अवलंबली आहे. शिवसेनेला कुठल्या जागा असाव्यात याची यादी करायला मी मुख्यमंत्र्यांनाच सांगितलंय. ते आता आम्हाला किती आणि कुठल्या जागा द्यायच्या आहेत याची यादी देतील आणि मी ती आमच्या पक्षासमोर ठेवणार आहे. भाजपच्या ‘या’ नेत्याने शिवसेनेच्या मतदारसंघात जाहीर केली स्वत:चीच उमेदवारी उद्धव ठाकरे यांच्या या खुलाश्यामुळे शिवसेना फार ताणून धरणार नाही असं बोललं जातंय. तर दोन्ही पक्षांदरम्यानची चर्चाही समाधानकारक असल्याचे संकेत त्यातून मिळत आहेत. त्यामुळे लवकरच ‘युती’च्या जागावाटपाची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. शिवसेना 50 टक्के फॉर्म्युल्यावर ठाम भाजप आणि शिवसेनेदरम्यान जागावाटपासाठी बोलणी सुरू आहे. ही बोलणी अंतिम टप्प्यात आली असं बोललं जात असतानाच शिवसेना समसमान जागावाटपावर ठाम असल्याची माहिती पुढे आली होती. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे पेच निर्माण होण्याची शक्यता आहे असंही बोललं जात होतं. शिवसेना पुन्हा एकदा 50:50 च्या जागा वाटपासाठी आग्रही आहे. दोन्ही पक्षांनी 288 पैकी 144-144 जागा वाटून घेण्याची शिवसेनेची भूमिका आहे.

‘आमच्या यात्रेत मैदान पुरत नाहीत आणि विरोधकांच्या…’,मुख्यमंत्र्यांची खोचक टीका

तर भाजपची जास्त जागांची मागणी आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमधल्या ज्येष्ठ लोकांना यावर तोडगा काढवा लागणार आहे. घटक पक्षांना देण्यात येणाऱ्या 18 जागांपैकी 9-9 जागा दोन्ही पक्षांनी आपल्या कोट्यातून द्याव्यात अशी शिवसेनेची मागणी आहे तर 174 भाजप आणि 114 शिवसेना = 288 जागा असा भाजपचा प्रस्ताव आणि या एकूण जागावाटप करुन प्रत्येकी 9 जागा घटक पक्षांना देण्याचा भाजपचा प्रस्ताव आहे. उद्धव ठाकरे यांच्या आजच्या खुलाश्यामुळे युतीत सर्व अलबेल असल्याचे संकेत मिळत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या