JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / भाजप आक्रमक, मुख्यमंत्री नाही तर शिवसेनेसोबत फक्त उपमुख्यमंत्रिपदावर चर्चा

भाजप आक्रमक, मुख्यमंत्री नाही तर शिवसेनेसोबत फक्त उपमुख्यमंत्रिपदावर चर्चा

उपमुख्यमंत्री पदाबाबत शिवसेनेने मागणी केल्यास भाजप चर्चेसाठी तयार आहे. मात्र पूर्ण 5 वर्ष मुख्यमंत्रिपद भाजपकडेच.

जाहिरात

Mumbai: Prime Minister Narendra Modi and Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis during the inauguration of stone-laying ceremony of various metro lines and inauguration of metro coaches, in Mumbai, Saturday, Sept 7, 2019. (PTI Photo/Shirish Shete) (PTI9_7_2019_000097B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विवेक कुलकर्णी, मुंबई 29 ऑक्टोंबर : भाजप आणि शिवसेनेत सत्तेतला वाटा आणि मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्षांमध्ये कलगीतुरा रंगल्यानं ऐन दिवाळीत राजकीय कलगीतुरा रंगलाय. शिवसेनेचा दबाव वाढत असल्याने आता भाजपनेही आक्रमक भूमिका घेतलीय. मुख्यमंत्रीपदावर कुठलीही तडजोड करायची नाही यावर भाजप ठाम आहे. भाजपने शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदाबाबत अजून कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही अशी माहिती सूत्रांनी दिलीय. मात्र उपमुख्यमंत्री पदाबाबत शिवसेनेने मागणी केल्यास भाजप चर्चेसाठी तयार आहे अशी माहितीही  सूत्रांनी दिली. कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्री पद सोडायचं नाही आणि अडीच वर्षांचा फॉर्म्युलाही स्वीकारायचा नाही, पाच वर्षं पूर्ण पद  स्वतःकडेच ठेवण्यावर भाजप ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे निर्माण झालेला हा पेच कसा सुटणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय. भाजपचे 75 आमदार शिवसेनेच्या संपर्कात? काय म्हणाले संजय राऊत! राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्ता स्थापनेचा संघर्ष सुरू झाला आहे. महायुतीची सत्ता स्थापन होईल असं म्हटलं जात असलं तरी सेना-भाजपमधल्या कुरबुरी संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 50-50 फॉर्म्युल्याची चर्चा झालीच नव्हती असं म्हटल्यानंतर आता खळबळजनक माहिती समोर येत आहे. सेना-भाजपमध्ये 50-50 फॉर्म्युल्याची चर्चा झाली मात्र त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

निवडणुकीत ‘लढणा’रे दोन नेते जेव्हा समोरासमोर येता तेव्हा…

सरकारमध्ये अर्धा वाटा मिळावा यासाठी सध्या सेनेकडून ठाम भूमिका घेतली जात आहे. खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर सेना भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेनेला 50-50 चे आश्वासन दिले नव्हते असं म्हटलं होतं. सेनेकडून सातत्यानं आधी ठरलं तेच झालं पाहिजे अशी मागणी होत असताना मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली होती. यातच आता 50-50 फॉर्म्युल्याबाबतची चर्चा दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांमध्ये झाल्याची माहिती समोर येत आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात ही चर्चा झाली होती अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या