JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / भाजप आमदाराने BMC नगरसेवकपदाचा मानधन केले बंद, 11 लाख जमा केला मुख्यमंत्री निधीत!

भाजप आमदाराने BMC नगरसेवकपदाचा मानधन केले बंद, 11 लाख जमा केला मुख्यमंत्री निधीत!

RTI मधून काही आमदार अजूनही नगरसेवकपदाचा प्रत्येक महिन्याला मानधन घेत असल्याची माहिती समोर आली होती

जाहिरात

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. मागील निवडणुकीत भाजपचे तब्बल 82 जागा जिंकल्या होत्या.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 जुलै : भाजपच्या आमदाराने मुंबई महापालिकेतून नगरसेवकाचा (BMC corporator) पगार घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. अखेर हे प्रकरण उजेडात आल्यानंतर भाजप आमदाराने आपला परत दिला आहे. भाजपचे आमदार पराग शहा (BJP MLA Parag Shah) यांनी घेतलेले संपूर्ण मानधन मुख्यमंत्री निधीत जमा केले आहे. तसंच. नगरसेवक पदाचे मानधन बंद करण्यासाठी चिटणीस खात्याला पत्र पाठविले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली (RTI activist Anil Galgali) यांनी आमदार असलेलं नगरसेवक प्रत्येक महिन्याला मानधन घेत असल्याची माहिती समोर आणली होती. तसंच खासदार मनोज कोटक आणि आमदार रमेश कोरगावकर मानधन घेत नाहीत. तर आमदार रईस शेख, पराग शहा आणि दिलीप लांडे यांना दरमहा रु. 25,000/-  मानधनासाठी आणि महापालिकेच्या प्रत्येक सभेकरिता रु. 150/- भत्त्यासाठी अशा केवळ चार सभांकरिता दिले जाते. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची मोठी घोषणा, पूरग्रस्त भागातील वीजबिल वसुलीला स्थगित अनिल गलगली यांच्या माहितीनंतर आमदार पराग शाह यांस गलगली यांच्याशी संपर्क साधत कळविले की, भविष्यात नगरसेवक पदाचे मानधन घेणार नाही. त्यांनी शब्द पाळत पालिका चिटणीस यांस पत्र पाठवून या महिन्यापासून मानधन तत्काळ बंद करण्याची विनंती केली आहे. शहा यांनी पुढे स्पष्ट केले की, आमदार झाल्यावर माझे नगरसेवक पदाचे मानधन बंद झाले असेल याच विचारात होतो मात्र ते सुरू असल्याचे मला अवगत नव्हते, अशी सारवासारव शहा यांनी केली. अनुष्कानं केलं राहुल-आथियाच्या नात्यावर शिक्कामोर्तब! Photo शेअर करत म्हणाली… अनिल गलगली यांनी याबाबत पराग शहा यांचे आभार मानत सांगितले की, हा माहिती अधिकार कायदाचा विजय आहे. सकारात्मक बाबीकडे लक्ष वेधले की सकारात्मक प्रतिसाद निश्चित मिळतो. आता रईस शेख आणि दिलीप लांडे काय निर्णय घेत आहेत की पराग शाह यांचे अनुकरण करतील, याकडे मुंबईकरांचे लक्ष आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या