JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / भुजबळांची वैद्यकीय तपासणी पूर्ण, निकाल लागताच तब्येतीत सुधारणा - सूत्र

भुजबळांची वैद्यकीय तपासणी पूर्ण, निकाल लागताच तब्येतीत सुधारणा - सूत्र

काल जामीन मिळालेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे. जामिनाची बातमी कळताच त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

05 मे : काल जामीन मिळालेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे. जामिनाची बातमी कळताच त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या दोन वर्षाहून अधिक काळ तुरुंगात असणाऱ्या छगन भुजबळांना काल हायकोर्टानं जामिन मंजूर केला. मात्र काल जामिनाची प्रत उशिरा मिळालानं त्यांची सुटका होऊ शकली नाही. आज भुजबळ यांच्या सुटकेचे कयास बांधले जात आहेत. सध्या भुजबळ यांच्यावर केआएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. केईएममध्ये तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. आता त्यांना थेट हॉस्पीटलमधून घरी जाऊ द्यायचं की कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी त्यांना पुन्हा जेलमध्ये हजेरी लावावी लागतेय हे काही वेळात स्पष्ट होईल. 14 मार्च 2016 रोजी भुजबळांना अटक झाली होती आणि 4 मे 2018 म्हणजे कालचा भुजबळांना जामीन मिळाला तो दिवस. या कालावधीत भुजबळांची प्रकृती बरीच खालावलीय. नाही म्हटलं तरी भुजबळांची सद्याची अवस्था पाहून त्यांच्या समर्थकांना नक्कीच वाईट वाटत असणार. वाढलेली पांढरी दाढी, डोक्यावर सदैव कानटोपी, खोल गेलेल डोळे, थकलेलं शरीर अशी भुजबळांची सध्याची अवस्था आहे. मात्र 2 वर्षांपूर्वींची भुजबळांची दृश्या पाहिल्यानंतर हेच का ते भुजबळ असा प्रश्न कुणालाही पडेल. पण आता या कारागृहातल्या सुटकेनंतर ते लवकरच बरे होतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, भुजबळांना जामिन मंजूर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लषो साजरा केला. त्यामुळे आता भुजबळ रुग्णालयातून बाहेर कधी येणार या प्रतिक्षेत भुजबळ कुटुंबिय आणि त्यांचे समर्थक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या