JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / बंजारा समाजाचे धर्मगुरू मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, संजय राठोडांचं कमबॅक?

बंजारा समाजाचे धर्मगुरू मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, संजय राठोडांचं कमबॅक?

संजय राठोड यांच्यावर एकापाठोपाठ आरोप प्रकरण सुरू असताना बाबूसिंग महाराज सह्याद्रीवर आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

जाहिरात

संजय राठोड यांच्यावर एकापाठोपाठ आरोप प्रकरण सुरू असताना बाबूसिंग महाराज सह्याद्रीवर आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 ऑगस्ट : शिवसेनेचे (shivsena) नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या मंत्रिमंडळवापसीची मध्यंतरी चर्चा रंगली होती. पण, एकापाठोपाठ होत असलेल्या आरोपांमुळे ही चर्चा तुर्तास थांबली होती. पण, आता पुन्हा एकदा राठोड यांच्या मंत्रिमंडळवापसीची चर्चेला सुरुवात झाली आहे. बंजारा समाजातले धर्मगुरू आणि पोहोरादेवीचे (poharadevi) मुख्य पिठाधीश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (cm uddhav thackery) भेटीला पोहोचले आहे. बंजारा समाजातचे धर्मगुरू आणि पोहरादेवीचे मुख्य पिठाधीश बाबूसिंग महाराज सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहे.  संजय राठोड यांच्यावर एकापाठोपाठ आरोप प्रकरण सुरू असताना बाबूसिंग महाराज सह्याद्रीवर आल्याने चर्चांना उधाण आले आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेटण्यासाठी  आलो, असल्याचं संस्थानच्या सूत्रांनी माहिती दिली आहे. ‘देवमाणूस’ परत येणार? अर्धवट शेवट झाल्याने चाहते नाराज परंतु, एकीकडे खुद्द शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्याबाबत भाष्य करत आहे. तर दुसरीकडे आता बंजारा समाजाकडूनही मुख्यमंत्र्यांना विनंती केली जात असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळवापसीच्या चर्चेंना पुन्हा वेग आला आहे. सुवर्णसंधी! राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे इथे होणार पदभरती मध्यंतरीच्या काळात पुणे पोलिसांनी पूजा चव्हाण प्रकरणात आपला अहवाल सादर केला होता. त्यानंतर माजी वनमंत्री संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळात समावेशाचे संकेत दिले होते. त्यानंतर आता संजय राठोड यांना पोलिसांनी क्लीन चिट दिल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यामुळे संजय राठोड हे मंत्रिमंडळात पुन्हा कमबॅक करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या