JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / राज ठाकरेंना 'लाव रे तो व्हिडीओ' आठवत असतील, थोरातांचा खोचक टोला

राज ठाकरेंना 'लाव रे तो व्हिडीओ' आठवत असतील, थोरातांचा खोचक टोला

राज ठाकरे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वाधिक टीका भाजपवर केली होती.

जाहिरात

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 6 ऑगस्ट रोजी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 जुलै : मुंबई महापालिकेची निवडणूक (mumbai municipal corporation election) पुढील वर्षी होणार आहे, पण तत्पूर्वीच महाराष्ट्रामध्ये नवीन राजकीय समीकरणं घडामोडी सुरू झाल्या आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांची आज मुंबई भेट झाली. या भेटीवर काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी राज ठाकरे यांना ‘लाव रे तो व्हिडीओ’ प्रयोग आठवत असतील, असं म्हणत खोचक टोला लगावला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांच्या दादर येथील कृष्णकुंज निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर न भविष्यात राज ठाकरे हिंदुत्वाचा अजेंडा घेण्याचे संकेत चंद्रकांत पाटील यांनी दिले. भाजप आणि मनसे महापालिकेच्या निवडणुकीत एकत्रित येण्याच्या चर्चेला यामुळे अधिकच बळ मिळाले आहे. राजकीय वर्तुळात या भेटीवर वेगवेगळ्या प्रक्रिया घडत असतानाच काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र राज ठाकरे यांना खोचक टोला लगावला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरे यांना भाजपा विषयी केलेली भाषणं आठवत असतील, त्यांनी ज्या पद्धतीने भाजपावर टीका केली आहे, त्यावरून तरी किमान राज ठाकरे भविष्यात भाजपा सोबत जातील असं तुर्तास तरी वाटत नाही, असंही थोरात म्हणाले. VIDEO: पुण्यात मृत गुंडाचा जंगी वाढदिवस, कोयते-बंदुका हवेत फिरवत टोळक्याची दहशत राज ठाकरे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वाधिक टीका भाजपवर केली होती. राज ठाकरे यांचा ‘लाव रे तो व्हिडिओ’ हा विषय खूप चर्चेचा झाला होता. आता मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी मनसे भाजप अशी नवीन राजकीय समीकरण सुरू झाले आहेत. त्याचाच भाग म्हणून चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांची गाठीभेटी सुरू असल्याचं म्हटलं जातंय.

अदार पूनावालांची मोठी घोषणा, Covishield घेतलेल्या विद्यार्थ्यांना सीरमकडून गिफ्ट

याबाबत मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे आमदार असलम शेख म्हणाले आहे की, ‘निवडणुकाजवळ येतानाच राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी या नेहमीच होत असतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले आहे. दुसरीकडे संजय राऊत शिवसेनेचे नेते आहेत, ते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी जवळीक साधतात, अशा राजकीय घडामोडी चालत राहत असतात. तुर्तास या राजकीय घडामोडींमुळे भाजप-मनसे होईल असं म्हणणं योग्य होणार नाही.’ असं शेख म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या