JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / फडणवीसांचा आणखी एक निर्णय राज्य सरकार फिरवणार, मंत्रालयात हालचालींना वेग

फडणवीसांचा आणखी एक निर्णय राज्य सरकार फिरवणार, मंत्रालयात हालचालींना वेग

या आधीही राज्य सरकारने फडणवीस यांच्या कार्यकाळात घेतलेले अनेक निर्णय फिरवले आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 01 ऑक्टोबर : राज्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा निर्णय फडवणीस सरकारने घेतला होता. आता महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीचा निर्णय मागे घेण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. दारूबंदी उठवावी का यासंदर्भात मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकील चंद्रपूर जिल्ह्यातले कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार, गृहमंत्री अनिल देशमुख तसेच राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. या आधीही राज्य सरकारने फडणवीस यांच्या कार्यकाळात घेतलेले अनेक निर्णय फिरवले आहेत. या बैठकीत दोन समित्यांचं गठण करण्यात आलं आहे. एक समिती ही राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांच्या अंतर्गत असेल या समितीत गृह, वित्त, तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी असणार आहेत तर दुसऱ्या समितीमध्ये शासकीय आणि अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये काही कॅबिनेट मंत्री आमदार तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी असणार आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांच्या अंतर्गत समिती पुढील एका महिन्या मध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी जाहीर केल्यानंतर तिथे अवैध दारू विक्री करण्यात आली का, जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढली का, तसेच उत्पादन आणि उत्पन्न यावर परिणाम झाला आहे का, याचा अहवाल देणार आहे. पार्थ पवारांची भूमिका सरकार विरोधात? सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली प्रतिक्रिया त्यानंतर शासकीय आणि अशासकीय समितीकडून अहवाल दिला जाईल असे सांगण्यात आले.  हा निर्णय उठवण्यासाठी मद्य विक्रेत्यांची लॉबी सक्रिया आहे. तर विविध सामाजिक आणि महिला संघटना अशा प्रकारची बंदी उठवण्याच्या विरोधात आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग हे दारुबंदी उठवण्याच्या निर्णया विरोधात आहेत. नेशवर जेवढा खर्च केला जातो आणि त्यामुळे जे नुकसान होतं ते बुडणाऱ्या महसूलापेक्षा कितीतरी जास्त होतंं असा त्यांचा दावा आहे. तर दारुबंदी ही व्यवहार्य नाही यामुळे काळाबाजारच जास्त होतो असा दावा दुसऱ्या बाजूने केला जात आहे. ‘दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा आपलं राज्य सांभाळा’; अनिल देशमुख योगींवर बरसले आत्तापर्यंत ज्या ठिकाणी दारुबंदी केली गेली तिथे तो प्रयोग फसल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे तातडीने दारुबंदी उठवावी अशी मागणी केली जात आहे. मंत्री विजय वडेट्टीवार सुद्धा दारुबंदी उठवण्याच्या बाजूने आहेत असं म्हटलं जात आहे. त्यावरून त्यांनी डॉ. बंग यांच्यावर टीकाही केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या