JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / BREAKING : आलियाने तोडले कोरोनाचे नियम, दिल्लीतून मुंबईत येताच कारवाईची शक्यता

BREAKING : आलियाने तोडले कोरोनाचे नियम, दिल्लीतून मुंबईत येताच कारवाईची शक्यता

करण जोहरच्या पार्टीत करीना कपूर, अमृता अरोरा, सोहेल खानची पत्नी सीमा खान, संजय कपूरची पत्नी महिप कपूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. याच पार्टीत आलिया देखील होती.

जाहिरात

संजय कपूरची पत्नी महिप कपूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. याच पार्टीत आलिया देखील होती.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 डिसेंबर : राज्यात कोरोनाचा (corona) नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या (omicron) रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे कोरोनाचे नियम कडक करण्यात आले आहे. पण बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी नियमांना केराची टोपली दाखवल्याची बाब समोर आली आहे. होम क्वारंटाईनचे (quarantine) उल्लंघन करणारी अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt ) आजच रात्री दिल्लीहून मुंबईला चाटर्ट विमानाने परतणार आहे. मुंबईत आल्यावर तिच्यावर कारवाईची शक्यता आहे. करण जोहरच्या (karan johar party) पार्टीत करीना कपूर ( (Kareena Kapoor Tested Corona Positive), अमृता अरोरा, सोहेल खानची पत्नी सीमा खान, संजय कपूरची पत्नी महिप कपूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. याच पार्टीत आलिया देखील होती. तिची चाचणी जरी निगेटीव्ह आली असली तरी तिला क्वारंटाईन रहाण्याचं बंधन होतं. मात्र तिनं तसं करता दिल्ली गाठल्याची माहिती समोर आली आहे. World Cup टीम सिलेक्शनवरून टीका, निवड समिती सदस्याचं शास्त्रींना प्रत्युत्तर दिल्ली आरोग्य विभागाचा ससेमिरा चुकवण्यासाठी आलिया भटचा पुन्हा मुंबईत माघारी फिरण्याचा निर्णय घेतला आहे. आज रात्री मुंबई विमानतळाच्या ८ नंबर गेट मधून आलिया भट घरी जाणार आहे. त्यावेळी कदाचीत बीएमसीचे आरोग्य विभाग आलिया भटवर कारवाई करण्याची ही शक्यता आहे.

राजकुमार राव-पत्रलेखाच्या लग्नाला झाला 1 महिना, सेलिब्रेशनच्या नादात केलं …

आज बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने दिल्लीतील प्रसिद्ध बंगला साहेब गुरुद्वारामध्ये दर्शन घेतल्याचे देखील काही फोटो समोर आले आहेत.आलिया भट्ट आपला खास मित्र आणि दिग्दर्शक आयान मुखर्जीसोबत याठिकाणी पोहोचली होती.आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच आयान मुखर्जीच्या बहुप्रतीक्षित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात झळकणार आहेत.या चित्रपटाचा आज मोशन पोस्टर रिलीज केला जाणार आहे. तत्पूर्वीच चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेत्रीने गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेतलं आहे. त्यानंतर ही बातमी समोर आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या