JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Agnipath Scheme : 'हा सैन्य दलाचा अपमान', संजय राऊत मोदी सरकारवर भडकले

Agnipath Scheme : 'हा सैन्य दलाचा अपमान', संजय राऊत मोदी सरकारवर भडकले

Agnipath Scheme Protest: कामगारांना आणि गुलामांना कंत्राटीपद्धतीने घेतलं जात असतं. देशाची सुरक्षा ज्यांच्यावर आहे. त्यांच्यासोबत असं कसं होऊ शकेल.

जाहिरात

कामगारांना आणि गुलामांना कंत्राटीपद्धतीने घेतलं जात असतं. देशाची सुरक्षा ज्यांच्यावर आहे. त्यांच्यासोबत असं कसं होऊ शकेल.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 जून :  केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ योजने’ला भारतातील अनेक भागांतून विरोध (Agnipath Scheme Protest).  होताना दिसत आहे. उत्तर भारतामध्ये तरुणांमध्ये आगडोंब उसळला आहे. ’ सैनिक कधीही कंत्राटपद्धतीने घेतले गेले नाही. देशाची सुरक्षा ज्यांच्यावर आहे. त्यांच्यासोबत असं कसं होऊ शकेल. हा भारतीय सैन्य दलाचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा अपमान आहे’ अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केली. केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ योजने’वरून उत्तर भारतात संतप्त पडसाद उमटत आहे. अनेक तरुण मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ‘मोदी सरकारची प्रत्येक योजना ही अपयशी ठरली आहे.  प्रत्येक योजना अशीच आहे. आधी 2 कोटी नोकरी देण्याची घोषणा केली होती. अच्छे दिनचे स्वप्न दाखवलं होतं. आता काय तर अग्निपथ काढले आहे. सैन्य हे पोटावर चालत असते. सैन्यात एक शिस्त असते. सैन्यात कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहे, भारतीय सैन्याची प्रतिष्ठा आहे ती रस्सातळाला जाईल, अशी टीका राऊ यांनी केली. (मधुमेहासाठी उपयुक्त असणाऱ्या जांभाळाचा वाढला भाव : VIDEO) तसंच, ‘सैनिक कधीही कंत्राटपद्धतीने घेतले गेले नाही. कामगारांना आणि गुलामांना कंत्राटीपद्धतीने घेतलं जात असतं.  देशाची सुरक्षा ज्यांच्यावर आहे. त्यांच्यासोबत असं कसं होऊ शकेल. हा भारतीय सैन्य दलाचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा अपमान आहे’ अशी टीकाही राऊत यांनी केली. ‘राष्ट्रपती निवडणुकीसाठी हालचाली सुरू आहे. प्रत्येक पक्षाकडून फोन केला जात असतो. भाजपकडून देशभरातील पक्षाला फोन केले जात आहे.  राजनाथ सिंह यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला. मोदी सरकारचे लोक संपर्कात आहे. दोन्ही बाजूने समर्थन असलेला उमेदवार उभा केला जात आहे. त्या दृष्टीने चर्चा सुरू आहे’ अशी माहितीही राऊत यांनी दिली. (आंदोलकांनी लावली ट्रेनला आग; कर्मचाऱ्याने जीवाची पर्वा न करता केलं भलं काम,VIDEO) घोटाळा झाल्याचे आरोपीने मान्य केले आहे. विक्रांत बचावच्या नावाखाली ते पैसे राजभवनात जमा केले नाही. ते पैसे आपल्याकडेच ठेवले. नंतर आता भाजपकडे जमा केले आहे, असं सांगत आहे. हा एक घोटाळा आहे. पोलीस अधिक तपास करत आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर टीका केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या