Home /News /heatlh /

Aurangabad Special Report : जांभाळांनी चांगलाच भाव खाल्लाय! मधुमेहासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या जांभाळाचे दर आहेत तर किती?

Aurangabad Special Report : जांभाळांनी चांगलाच भाव खाल्लाय! मधुमेहासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या जांभाळाचे दर आहेत तर किती?

फळ

फळ मार्केट, औरंगाबाद.

औरंगाबाद मार्केटमध्ये सध्या मधुमेहासाठी आणि त्वचारोगासाठी उपयुक्त असणाऱ्या जांभाळाचे दर वाढले आहेत. घाऊक बाजारात 5 हजार प्रति कॅरेट, तर किरकोळ विक्रेत्यांसाठी 150 प्रतिकिलोने जांभाळाचे दर आहे.

    औरंगाबाद, 18 जून : उन्हाळा संपत असताना आणि पावसाळा सुरू होत असताना बाजारात रसरशीत, काळेभारे जांभूळ पाहायला मिळतात. सध्या औरंगाबात मार्केटमध्ये जांभूळ (Purple) दाखल झाले आहेत. पण, या रसरशीत जांभळांना चांगलाच भाव मिळाला आहे. मधुमेह रुग्णांसाठी गुणकारी आणि चवीला आंबट गोड असलेल्या जांभळाची बाजारपेठेत (Purple rates in Aurangabad Market) आवक कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे 200 ते 250 रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. वाचा : Health Tips: सकाळी रिकाम्या पोटी ड्रायफ्रुट्स खा, होतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे! बाजारपेठेतील ठोक विक्रेते इम्रान शेख सांगतात की, "बाजारपेठेत जांभूळ हे 4-5 हजाराने कॅरेट विक्री होत आहे. तर 150 रुपये प्रमाणे किरकोळ विक्रेत्यांना मिळत आहे. सुरुवातीला या जांभळाची किंमत जास्त असते. एक-दोन पाऊस पडल्यानंतर जांभळाची किंमत कमी होते. औरंगाबादमध्ये नगर, राहुरी, जळगाव आणि शिर्डी भागातून जांभूळ येत आहेत. पण, पुढील काही दिवसांत जांभाळाचे भाव कमी होतील." जांभळं का खावीत? मधुमेह असलेल्या रुग्णांना जांभळाचे आरोग्यासाठी चांगले फायदे आहेत. जांभूळ हे शरीरातील शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. यामुळे जांभळाच्या सीझनमध्ये शुगर असलेले व्यक्ती मोठ्या प्रमाणात जांभुळ खरेदी करण्यासाठी येत असतात. यामुळे कमी सीझनचा असलेलं हे जांभूळ सुरवातीच्या काळामध्ये जास्त भाव खाऊन जातो. वाचा : Yoga Day 2022: मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी Yoga कराच; पण आसनं करताना घ्या ही काळजी जांभूळ त्वचेसाठी गुणकारी जांभूळ हे त्वचेसाठीदेखील गुणकारी म्हणून वापरलं जातं. जांभळाच्या बिया मुरूम आणि पिंपल्स दूर करण्यासाठी उपयोगी आहेत. या जांभळाच्या पानांमध्ये बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म असल्याने याचा शरीराला फायदा होतो यामुळे त्वचेसाठी हे जांभूळ गुणकारी आहे, यामुळे याची बाजारात मागणी मोठ्या प्रमाणात असते. जांभाळासंबंधी थोडक्यात माहिती प्राचीन काळापासून ही वनस्पती भारतामध्ये उपलब्ध आहे. आयुर्वेदात बऱ्याच फळांचे औषधांसाठी महत्त्व सांगितले जाते. या फळांपैकी एक म्हणजे जांभूळ. ग्रीष्म ऋतूत आंबा तर वर्षा ऋतु जांभळे फळ असतं. जांभूळ हे फळ उन्हाळ्याच्या शेवटी पावसाळ्याच्या सुरुवातीला अवघ्या पंधरा दिवसाचा सीझनमध्ये येत असते. शेताच्या बांधावर या जांभळाची झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात. जांभळाचे झाड असल्याने त्याची फळ काढणे हे कसरतीचे असते.
    First published:

    Tags: Agriculture, Cricket news, Health, Health Tips, Lifestyle, महाराष्ट्र

    पुढील बातम्या