शिवसेनेचे 12 खासदार उद्धव ठाकरेंना देणार मोठा धक्का, भाजप खासदाराचा दावा
नवी दिल्ली, 18 जुलै : विधानसभेनंतर लोकसभेतही शिवसेनेला झटका बसल्याचं चित्र आहे. आधीच आमदारांनी शिवसेनेकडे (Shivsena) पाठ फिरवल्यामुळे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले. आता तर पक्ष आणि निवडणुकीचं चिन्हंही हातातून जातं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आमदारांनंतर आता शिवसेनेच्या खासदारांनी एकनाथ शिंदे गटासोबत हातमिळवणी केल्याचं वृत्त सूत्रांकडून सांगितलं जात आहे. शिंदे गटाच्या बैठकीला 12 शिवसेनेच्या खासदारांनी हजेरी लावल्याचं सांगितलं जात आहे. धक्कादायक म्हणजे शिवसेनेचे 12 खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार आहे. उद्धव ठाकरेंना आता खासदारांकडून दणका मिळाला आहे. नाशिकमधील शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे ही नव्या गटात जाणार असून नवा गटाचा प्रतोद पदी राहुल शेवाळे यांची केली जाणार नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे खासदार. उपस्थित १२ खासदार 1 सदाशिव लोखंडे 2 हेमंत गोडसे 3 हेमंत पाटील 4 राजेंद्र गावित 5 संजय मंडलीक 6 श्रीकांत शिंदे 7 श्रीरंग बारणे 8 राहुल शेवाळे 9 प्रतापराव जाधव 10 धैर्यशील माने 11 कृपाल तुमाने 12 भावना गवळी अनुउपस्थित ७ खासदार 1 विनायक राऊत 2 गजानन किर्तीकर 3 अरविंद सावंत 4 ओमराजे निंबाळकर 5 संजय जाधव 6 राजन विचारे 7 कलाबेन डेलकर