मुंबई, 29 मे: परप्रांतीय मजूर आपापल्या घरी परत जावेत या उद्देशाने भारतीय रेल्वे दररोज श्रमिक विशेष गाड्या देशभरात चालवत आहे. या सेवेचा लाभ घेत असलेल्या आणि ज्यांची वैद्यकीय स्थिती आधीपासूनच बिघडलेली आहे, त्यांना कोविड-19 साथीच्या आजारात अजून धोका वाढण्याची शक्यता आहे. हेही वाचा.. लॉकडाऊन यापुढे आणखी वाढवायचा का? याबाबत काय म्हणाले अजित पवार आधीपासूनच विविध आजार असलेल्या लोकांच्या मृत्यूच्या काही दुर्दैवी घटना प्रवासादरम्यान घडल्या आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे गर्भवती महिला, 10 वर्षांखालील मुले आणि 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी रेल्वेचा प्रवास शक्यतो टाळावा, असं आवाहन रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांना केलं आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, कर्करोग, रोगप्रतिकारशक्ती कमतरता असलेले रुग्ण, गर्भवती महिला, 10 वर्षांखालील मुले आणि 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी रेल्वेचा प्रवास शक्यतो टाळावा, असं रेल्वेने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटलं आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले की, देशातील काही नागरिक यावेळी रेल्वे प्रवास करू इच्छितात. त्यांना रेल्वे सेवा मिळावी यासाठी भारतीय रेल्वे परिवार 24×7 सतत कार्यरत आहे. प्रवाशी सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. त्यासाठी आपले सहकार्य अपेक्षित आहे. कुठल्याही कठीण प्रसंगी, आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे परिवाराशी संपर्क साधा. हेल्पलाईन क्रमांक- 139 आणि 138 वर रेल्वे आपल्या सेवेत तत्पर आहे. हेही वाचा.. लग्नानंतर तब्बल 10 वर्षांनी त्यांच्या घरात हलला होता पाळणा, पण कोरोनानं… दरम्यान, रेल्वे पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न होत असताना परराज्यात जाण्यासाठी रेल्वे 1 जूनपासून सुरु धावणार आहे. या गाड्या आता कोणत्या स्थानकावर थांबणार आहेत, त्याची यादी जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे ही यादी प्रवाशांना पाहणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांना दुसऱ्याच स्थानकावर उतरावे लागेल. येत्या सोमवारपासून भारतीय रेल्वे 200 अतिरिक्त गाड्या चालवणार आहे. मात्र, ज्या गाड्या चालवल्या जातील त्या तुमच्या घराजवळील स्टेशनवर थांबतील की नाही.