JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / राज्याच्या पोलीस दलाला कोरोनाचा विळखा, तब्बल 2 हजार 497 पोलिसांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह!

राज्याच्या पोलीस दलाला कोरोनाचा विळखा, तब्बल 2 हजार 497 पोलिसांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह!

मागील तीन दिवसातील राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची आकडेवारी पाहता यात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 जानेवारी : राज्यात कोरोनाबाधित (maharashtra corona cases) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मुंबईसह राज्यातील पोलिसांना कोरोनाची लागण (Corona infection to police) होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून राज्यात गेल्या चोवीस तासात 82 अधिकारी आणि 321 अंमलदार अशा एकूण 403 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांचा आकडा 02 हजार 497 वर पोहचला आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेतही राज्यातील पोलीस दलाला याचा फटका बसत असल्याचे चित्र सध्या आहे. मागील तीन दिवसातील राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची आकडेवारी पाहता यात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.  तीन दिवसांत अनुक्रमे 298, 370 आणि 403 अशी पोलीस कोरोना रुग्णवाढ नोंदविली गेली आहे. तर, सौम्य लक्षणे असलेल्या 09 हजार 518 पोलिसांना विलगीकरणात पाठविण्यात आले आहे. ( राजकीय भूमिकेमुळे मालिकेतून काढल्याचा किरण मानेंचा आरोप ; म्हणाले… ) राज्य पोलीस दलात गेल्या सात दिवसांत 439 अधिकारी आणि 01 हजार 665 अंमलदार अशा एकूण 02 हजार 104 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर, कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये राज्यात आतापर्यंत 48 हजार 971 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यात 06 हजार 278 पोलीस अधिकारी आणि 42 हजार 693 अंमलदारांचा समावेश आहे. कोरोनाची लागण झालेल्या 45 हजार 970 पोलिसांनी यशश्‍वीरीत्या कोरानावर मात केली आहे. कोरोनाची लागण झालेल्या गेल्या चोवीस तासांतील 82 अधिकार्‍यांपैकी 77 अधिकार्‍यांनी आणि 321 अंमलदारांपैकी 273 अंमलदारांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, यातील 03 अधिकारी आणि 12 अंमलदारांना दुसर्‍यांदा कोरोनाची लागण झाली आहे. ( ‘तुला असं पाहून लाज वाटते’, हिरो नंबर-1 गोविंदाचा VIDEO पाहून भडकले चाहते ) गेल्या चोवीस तासात कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये मुंबई पोलीस दलातील 30 अधिकारी आणि 99 अंमलदार अशा एकूण 129 जणांचा समावेश आहे. तर, कोरोनाची लागण होऊन मुंबईत आतापर्यंत सर्वाधिक 126 पोलीस मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील नागरिकांनी कोरोना नियमाचे पालन करणे गरजेचे आहे अन्यथा जर पोलिसांना धोरणाचे लागण होण्याचे प्रमाण अशीच दिवसेंदिवस वाढत राहिले तर मात्र राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या