मुंबई, 25 जुलै : Zomato चा स्टॉक आज सोमवार 25 जुलै रोजी 50 रुपयांपर्यंत खाली आला आहे. शेअर त्याच्या उच्चांकापासून सुमारे 72 टक्के आणि IPO किंमतीपासून सुमारे 40 टक्के खाली आला आहे. झोमॅटोच्या स्टॉकची अवस्था पाहून बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचं वक्तव्य आज गुंतवणूकदारांना आठवत आहे. राकेश झुनझुनवाला यांची मुलाखत गेल्या वर्षी ऑक्टोबर 2021 मध्ये इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये झाली होती. यात त्यांना नव्याने लिस्टिंग झालेल्या कंपन्यांच्या मूल्यांकनाबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा झुनझुनवाला यांनी, 5 वर्षांनी भेटू… असं म्हटलं होतं. पण ती वेळ 5 वर्षांनी नाही तर वर्षभरात आली आहे. औषधांचा खर्च कमी होणार? कर्करोग, मधुमेह रुग्णांना दिलासा मिळण्याची शक्यता त्यांनी झोमॅटोसह सर्व नवीन लिस्टिंग कंपन्यांच्या मूल्यांकनावर प्रश्न उपस्थित केला होता आणि ते म्हणाले की कमाई न करणाऱ्या कंपन्यांचे मार्केट कॅप कशाच्या आधारावर इतके जास्त आहे. आता झोमॅटो विकत घेऊ नका असं म्हटलं तर लोक येड्यात काढतील. पण आपण पाच वर्षांनी भेटू. पाच वर्षे उलटली नाहीत, पण वर्षभरातच राकेश झुनझुनवाला यांचे म्हणणे खरे ठरताना दिसत आहे. त्यानंतर झुनझुनवाला यांनी अनेक प्लॅटफॉर्मवर या नवीन-युगातील लिस्टिंग कंपन्यांच्या मूल्यांकनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. दोन मुलं आणि पतीचं निधन, धीर न सोडता घरातच सुरु केली शाळा; द्रोपदी मुर्मू यांचा खडतर प्रेरणादायी प्रवास झोमॅटोचा शेअर 50 रुपयांच्या खाली झोमॅटोमध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आता दररोज काही ना काही नकारात्मक बातम्या येत आहेत. या फूड डिलिव्हरी कंपनीत पैसे गुंतवणाऱ्यांसाठी आजचा दिवस वाईट ठरला. आज शेअर बाजारात Zomato चा शेअर 50 रुपयांच्या खाली आला. NSE वर स्टॉकमध्ये 11 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. दुपारी 12 वाजेच्या दरम्यान शेअर 11.84 टक्क्यांच्या घसरणीसह 48 रुपयांच्या खाली ट्रेड करत होता. शेअर प्रथमच 50 रुपयांच्या खाली आला आहे. Zomato ची मार्केट कॅप 37,000 कोटी रुपयांच्या खाली पोहोचली आहे.