JOIN US
मराठी बातम्या / मनी / LIC Policy धारकांना मोठा धक्का! सरकारने बदलले 'हे' नियम

LIC Policy धारकांना मोठा धक्का! सरकारने बदलले 'हे' नियम

देशातील सर्वात मोठी लाइफ इंश्योरेंस कंपनी LIC कडून मोठी माहिती समोर येत आहे. यापूर्वी केंद्र सरकार एलआयसीवर भरमसाठ कराचा लाभ देत होते, परंतु यावेळी नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.

जाहिरात

एलआयसीवर नवीन अपडेट्स

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी: देशातील सर्वात मोठी लाइफ इंश्योरेंस कंपनी LIC कडून मोठी माहिती समोर येत आहे. यापूर्वी केंद्र सरकार एलआयसीवर भरमसाठ कराचा लाभ द्यायचे. परंतु यावेळी नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आलाय. एलआयसी पॉलिसी घेतल्यानंतरही लोकांना टॅक्स भरावा लागणार आहे. आयकर नियमांनुसार, एलआयसीची पॉलिसी खरेदी केल्यास टॅक्स सवलतीचा लाभ मिळतो. करमुक्तीमुळे विमा कंपन्या अतिशय मजबूत स्थितीत आहेत. ग्राहक हे जास्तती जास्त टॅक्स वाचवण्यासाठी एलआयसीची पॉलिसी घेतात.

अध्यक्षांनी दिली मोठी माहिती

माहिती देताना एलआयसीच्या अध्यक्षांनी सांगितले की, कंपनीच्या एकूण वार्षिक प्रीमियमपैकी अर्धी रक्कम जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात येते. आर्थिक वर्षाच्या शेवटी, लोक विमा पॉलिसी खरेदी करण्यात लोक खूप रस दाखवतात. लोक कोणताही विचार न करता टॅक्स वाचवण्यासाठी विमा पॉलिसीमध्ये पैसे गुंतवतात.

‘या’ LIC पॉलिसीची देशभरात धूम! 15 दिवसात 50 हजारांपेक्षा जास्त लोकांनी केली खरेदी

अर्थसंकल्पात घेतले मोठे निर्णय

2023 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे की, आतापासून 5 लाख रुपयांपेक्षा जास्त प्रीमियम असलेल्या पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर कर भरावा लागेल. यासह, सरकार देशभरात न्यू टॅक्स रिजीमला प्रोत्साहन देत आहे. ज्यामध्ये करात सूट नाही. म्हणजेच, जे आता कर वाचवण्यासाठी एलआयसी पॉलिसी घेतात, ते भविष्यात ती घेणे बंद करू शकतात.

एलआयसीच्या ग्रोथवर होईल परिणाम

येत्या काळात सरकारच्या या निर्णयाचा परिणाम विमा कंपन्यांवर पाहायला मिळू शकतो. त्याचा थेट परिणाम एलआयसीच्या ग्रोथवर होणार आहे.

फक्त 150 रुपयांत सुधारेल मुलांचे भविष्य, LIC च्या या योजनेत आजच करा गुंतवणूक

संबंधित बातम्या

अध्यक्षांनी दिली मोठी माहिती

LIC चे चेअरमन म्हणाले की, याचा थोडासा परिणाम होण्याची अपेक्षा आहे. कारण सध्या 1 टक्क्यांपेक्षा कमी अशा पॉलिसी आहेत, ज्यांचे प्रीमियम 5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. दुसरीकडे, जर एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त एलआयसी पॉलिसी असतील आणि त्यांचा एकूण प्रीमियम एकत्रितपणे 5 लाखांपेक्षा जास्त असेल, तर ग्राहकाला यावर कर सवलतीचा लाभ मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या