EPF खात्यातून पैसे काढले तरी TDS कापला जाणार नाही, वापरा ‘हे’ 5 सोपे मार्ग
मुंबई, 31 ऑक्टोबर: तुम्ही एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच ईपीएफ बद्दल ऐकलं असेल की त्यात जमा केलेल्या पैशावर कर सूट आहे. परंतु ही सूट प्रत्येक परिस्थितीसाठी नाही. जर तुम्ही मुदतपूर्तीपूर्वी EPF खात्यातून आंशिक किंवा पूर्ण पैसे काढले तर त्या रकमेवर कर आकारला जातो. त्याचा सर्वात मोठा आणि मुख्य नियम असा आहे की जर EPF चे पैसे सलग 5 वर्षे सेवा पूर्ण करण्यापूर्वी काढले गेले तर त्यावर TDS कापला जातो. एक चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला एकाच कंपनीत सलग 5 वर्षे काम करावं लागेल असं नाही. संस्था बदलून 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही EPF काढल्यावर TDS कापला जात नाही. दुसरा नियम म्हणतो की तुम्ही 2 वर्षांसाठी कंसल्टंट किंवा काँट्रॅक्टवर कंपनीत काम करत असाल, तर या दरम्यान तुमचा पीएफ कापला जात नाही. दोन वर्षांनंतर कंपनीनं तुम्हाला पगारावर घेतलं आणि तुम्ही कायमचे कर्मचारी झालात, तर यासोबतच तुमचा पीएफ डिपॉझिटही सुरू होतं. या कंपनीत 5 वर्षे पूर्ण केल्यानंतर तुम्ही नोकरी सोडून दुसऱ्या कंपनीत रुजू झालात. तुम्हाला अचानक पैशांची गरज भासू लागली आणि पीएफमधून पैसे काढले, तर तुम्हाला कळले की पीएफ काढल्यावर टीडीएस कापला गेला आहे. ही खास गोष्ट लक्षात ठेवा- तुम्ही विचार करत असाल की आधीच्या कंपनीत 5 वर्षे काम केलं आणि त्यानंतर पीएफमधून पैसे काढले, मग पैसे काढल्यावर टीडीएस का कापला गेला. याचं उत्तर असं आहे की तुम्ही कंपनीत 5 वर्षे काम केलं असलं तरी कायमस्वरूपी कामाची केवळ 3 वर्षे मोजली जातील. कारण तुमचा पीएफ त्या कालावधीत जमा झाला आहे, संपूर्ण 5 वर्षांसाठी नाही. यातून वाचण्यासाठी तुम्ही काहीतरी मार्ग शोधत असाल. चला तर मग आज आपण यावरील उपयांवर चर्चा करूया. हेही वाचा: आता UPI वरूनही पेन्शन स्कीममध्ये टाकू शकता पैसे, ‘या’ स्टेप्स करा फॉलो TDS वाचवण्याचे मार्ग-