जगातील सर्वात छोटा विमान प्रवास
Worlds shortest flight: लोक नेहमी परदेशात जाण्यासाठी विमानाने जातात. हजारो किलोमीटरचा प्रवास विमानाने काही तासांत पूर्ण करता येतो. देशातही लोक लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी विमानाने प्रवास करणे पसंत करतात. पण तुम्ही अशा हवाई प्रवासाविषयी ऐकले आहे का ज्यामध्ये विमान टेक ऑफ होताच लँड होते आणि प्रवासी दीड मिनिटात ठरलेल्या स्थळावर पोहोचतो. आता तुम्ही म्हणत असाल की, हे कसं शक्य आहे? पण हे सत्य आहे.
जगात असं एक ठिकाणी आहे. जिथे विमान सर्वात कमी अंतर कापून 90 सेकंदात विमानतळावर उतरते. एकदा ते अवघ्या 53 सेकंदात उतरले होते जो एक विक्रम आहे. विमानाने हा अनोखा प्रवास कुठून कुठे केला याविषयी आपण जाणून घेऊया.
जगातील सर्वात लहान हवाई प्रवास स्कॉटलंडमध्ये होतो. येथे विमानाला 2 आयलंड वेस्ट्रे आणि पापा वेस्ट्रे मधील अंतर कापण्यासाठी 90 सेकंद लागतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोन बेटांमधील अंतर केवळ 2.7 किलोमीटर आहे. तरीही यासाठी लोक विमानाने प्रवास करतात. एखादी व्यक्ती कार किंवा सायकलने किंवा चालत इतके अंतर पार करू शकते. या प्रवासात विमानाला टेक ऑफपासून लँडिंगपर्यंत केवळ दीड मिनिटांचा कालावधी लागतो.
Railway Track Stones: रेल्वे ट्रॅकवर का असतात टोकदार दगडं? जाणून घ्या रोचक तथ्यआता मनात प्रश्न पडतो की एवढ्या कमी अंतरासाठी लोकांना विमानाचे मोठे भाडे मोजावे लागत असेल. अर्थात ते देतात कारण असंही विमान प्रवास महाग असतो. खरंतर या दोन बेटांमध्ये पूल नसल्यामुळे लोकांना विमानाने प्रवास करावा लागतो. याच कारणामुळे सरकार यासाठी नागरिकांना हवाई भाड्यात सूट देते.
भारतातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कोणतं? देशातील कोणत्याही भागासाठी पकडू शकता ट्रेनया प्रवासासाठी मोठी विमाने नसून लहान प्लेन असतात. ज्यामध्ये फक्त 8 प्रवासी बसू शकतात. लोगान एअर ही हवाई प्रवास चालवते आणि 50 वर्षांपासून आपली सेवा देतेय.