JOIN US
मराठी बातम्या / मनी / Savings Day : 'जागतिक बचत दिन' का साजरा करतात, याची सुरुवात कशी झाली?

Savings Day : 'जागतिक बचत दिन' का साजरा करतात, याची सुरुवात कशी झाली?

प्रत्येक व्यक्तीने पैशांची बचत करणे आवश्यक आहे. आपल्या लहानपणी आई वडील अगदी एक एक रुपयांची बचत करायला शिकवायचे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : बचत करण्याचं महत्त्व वाढावं आणि घराघरात ते पोहोचावं या उद्देशानं जगभरात आज बचत दिवस साजरा केला जातो. लहानपणी आई-वडिलांकडून पहिल्यांदा शिकलेले पैसे वाचवणं हा आपल्या आयुष्याचा मुख्य पैलू आहे. पैसा वाचवणं हे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं. प्रत्येक व्यक्तीने पैशांची बचत करणे आवश्यक आहे. आपल्या लहानपणी आई वडील अगदी एक एक रुपयांची बचत करायला शिकवायचे. वेळ जेवढा मौल्यवान आहे तेवढाच एक एक पैसा महत्त्वाचा असतो असं त्यावेळी सांगायचे. काय आहे इतिहास? जागतिक बचत दिनाची सुरुवात 1924 रोजी इटलीतील मिलान इथे काँग्रेसने आयोजित केलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय बचतीपासून झाली. एक इटालियन प्राध्यापकाने 31 ऑक्टोबर हा दिवस जागतिक बचत दिन म्हणून घोषित केला. पहिल्या महायुद्धानंतर लोकांना पैशांची बचत करण्याचं आणि बँकांवर विश्वास ठेवण्याबाबत मोठी मोहीम राबवण्यात आली होती.

Savings Day : किती Bank Account उघडता येतात, त्याचे फायदे माहिती आहेत का?

लोकांना पैशांची मोठ्या प्रमाणात बचत करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं. हळूहळू हे सगळ्याच देशांमध्ये होऊ लागलं. शाळा कार्यालये इथे लोकांना बचतीचं महत्त्व सांगू लागले. दुसऱ्या महायुद्धानंतर याचं महत्त्व अधिक वाढलं. आता दरवर्षी 31 ऑक्टोबरला जागतिक बचत दिवस साजरा केला जातो. काय आहे या दिवसाचं महत्त्व? विद्यार्थ्यापासून ते कार्यालयातील कर्मचाऱ्यापर्यंत प्रत्येकामध्ये बचत करण्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी बचत भविष्यासाठी अडीअडचणीसाठी का महत्त्वाची हे सांगितलं जातं. यंदाच्या जागतिक बचत दिनाची थीम आहे “बचत तयारी तुम्ही भविष्यासाठी” ही गेल्या वर्षीच्या थीमशी मोठ्या प्रमाणात जोडली गेली आहे, ज्यात बचतीचे महत्त्व यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे. अनेकदा माहितीपर मोहिमा आयोजित करून आणि बचत प्रोत्साहन योजना जाहीर करून हा दिवस साजरा केला जातो.

तुम्ही किती Saving Account उघडू शकता, RBI चा नियम काय सांगतो?

संबंधित बातम्या

यंदाच्या जागतिक बचत दिनाची थीम आहे “बचत तयारी तुम्ही भविष्यासाठी” ही गेल्या वर्षीच्या थीमशी मोठ्या प्रमाणात जोडली गेली आहे, ज्यात बचतीचे महत्त्व यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे. अनेकदा माहितीपर मोहिमा आयोजित करून आणि बचत प्रोत्साहन योजना जाहीर करून हा दिवस साजरा केला जातो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या