JOIN US
मराठी बातम्या / मनी / कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; 1 एप्रिलपासून कामाची वेळ बदलणार, पाहा काय आहे सरकारचा प्लॅन

कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; 1 एप्रिलपासून कामाची वेळ बदलणार, पाहा काय आहे सरकारचा प्लॅन

1 एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी काही मोठे बदल होऊ शकतात. या बदलांनंतर नोकरदार वर्गाचा पीएफ, कामाचे तास आणि वेतन यांसारख्या अनेक नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय ग्रॅच्युटी आणि पीएफही वाढेल. त्यामुळे कर्मचाऱ्यांची टेक होम सॅलरी कमी होईल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 30 मार्च : तुम्हीही नोकरी करत असाल, तर 1 एप्रिलपासून तुमच्यासाठी काही मोठे बदल होऊ शकतात. या बदलांनंतर तुमचा पीएफ, कामाचे तास आणि वेतन यांसारख्या अनेक नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय ग्रॅच्युटी आणि पीएफही वाढेल. त्यामुळे नोकरदारवर्गाची टेक होम सॅलरी कमी होईल. दरम्यान, या प्रस्तावाच्या नियमांवर अद्यापही विचार सुरू असून याची अंमलबजावणी कशी करावी यावर चर्चा सुरू आहे. मागील वर्षी संसदेत पास केलेल्या कोड ऑन वेजेज या तीन बिलांमुळे हे बदल होऊ शकतात. हा प्रस्ताव या वर्षी 1 एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता आहे. कसे आणि कोणते बदल होऊ शकतात? सॅलरीमध्ये होऊ शकतो बदल - सरकारच्या प्लॅननुसार, 1 एप्रिलपासून मूळ वेतन, एकूण वेतनाच्या 50 टक्के किंवा अधिक असावं. या बदलामुळे कंपनी आणि कर्मचारी दोघांनाही फायदा होण्याचा सरकारचा दावा आहे. PF मध्ये वाढ होण्याची शक्यता - नव्या नियमांनुसार, पीएफमध्ये वाढ होऊ शकते, त्यामुळे इन हँड सॅलरी कमी होऊ शकते. मूळ वेतन, एकूण वेतनाच्या 50 टक्के किंवा अधिक असावं, या बदलामुळे अधिकतर लोकांच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये बदल होऊ शकतो. मूळ वेतन वाढल्याने, तुमच्या पीएफमध्येही वाढ होईल, कारण हे तुमच्या बेसिक सॅलरीवर आधारित असतं.

(वाचा -  केवळ 94 पैसे दररोज खर्च करुन मिळवा 4 लाखांचा इन्शोरन्स, घरबसल्या असा घ्या फायदा )

12 तास काम करण्याचा प्रस्ताव - 12 तास काम करण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय 15 ते 30 मिनिटं एक्स्ट्रा काम करणं ओव्हरटाईममध्ये सामिल करण्याची तरतूद आहे. सध्याच्या स्थितीत 30 मिनिटांहून कमी काळासाठी एक्स्ट्रा काम केल्यास त्याला ओव्हरटाईममध्ये सामिल केलं जात नाहीये. 5 तास काम केल्यानंतर अर्धा तासाचा ब्रेक - 5 तासांहून अधिक काळ सलग काम करण्यावर प्रतिबंध केला जाईल. सरकारचं असं म्हणणं आहे की, कर्मचाऱ्यांना 5 तास काम केल्यानंतर अर्धा तासाचा ब्रेक दिला जावा.

(वाचा -  केवळ 15000 रुपयांत सुरू करा तुळशीची शेती; 3 लाखांपर्यंत होईल कमाई )

सेवानिवृत्तीची रक्कम वाढेल - पीएफची रक्कम वाढल्याने सेवानिवृत्तीच्या रकमेतही वाढ होईल. रिटायरमेंटनंतर लोकांना या रकमेचा फायदा होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या