JOIN US
मराठी बातम्या / मनी / रुपयाची घसरण कधी आणि कशी थांबणार? तुमच्यावर कसा होणार गंभीर परिणाम?

रुपयाची घसरण कधी आणि कशी थांबणार? तुमच्यावर कसा होणार गंभीर परिणाम?

यंदा 12 टक्क्यांची घसरण झाली. हे सर्व पाहिल्यानंतर आता अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयात सुरू असलेली घसरण कधी थांबणार,

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : ऐन दिवाळीत सर्वसामान्यांचं टेन्शन दुप्पट वाढलं आहे. डॉलरचं मूल्य दिवसेंदिवस वाढत आहे आणि रुपया नीचांकी पातळीवर जात आहे. अजून किती घसरणार रुपया असा प्रश्न सर्वसामान्य आणि गुंतवणूकदारांना पडला आहे. याचं कारण म्हणजे महागाई तेवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत भारतीय रुपया 2 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. यंदा 12 टक्क्यांची घसरण झाली. हे सर्व पाहिल्यानंतर आता अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयात सुरू असलेली घसरण कधी थांबणार, हा एकच प्रश्न सर्वांच्या मनात आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी यूएस फेडर आणि RBI दोन्ही बँका व्याजदरात वाढ करत आहेत. त्याचा ताण EMI, लोन वाढल्याने सर्वसामान्य माणसावर येत आहे. आरबीआय गव्हर्नरच या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतील? मात्र आरबीआय गव्हर्नरसमोर दोन मोठ्या समस्या असल्याचं अनेक संशोधन अहवालात म्हटलं आहे. पहिल्या रुपयाची घसरण रोखणं आणि दुसरे म्हणजे, भारताच्या चलनसाठ्यात डॉलरची बचत करणे आहे. dhanteras 2022 : धनत्रयोदशीला किती कॅरेटचं सोनं घ्यावं? 24, 22, 18 की 14 यात नेमका काय फरक? रुपया का घसरतोय? जगातील सर्व देशांकडे परकीय चलनाचा साठा आहे, ज्याद्वारे ते परदेशातून व्यवहार करतात. त्याला लागणाऱ्या वस्तू विकत घेतात. भारताच्या परकीय चलन साठ्यातील डॉलर अमेरिकन रुपयाच्या साठ्याएवढा असेल, तर रुपयाचे मूल्य स्थिर राहील नाही तर मूल्य वाढत जाईल. आरबीआय गव्हर्नरने रुपया वाचवण्यासाठी डॉलरची विक्री केली तर चलनाचा साठा कमी होईल. डॉलर विकला नाही त्याला आपल्याकडे ठेवलं तर रुपयाचं मूल्य घसरतं. सध्याची ही कठीण परिस्थिती हाताळण्यासाठी आरबीआयकडे काही मोजकेच पर्याय उरले आहेत, असे काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ब्रोकरेज अहवालानुसार रुपयाची घसरण सुरू आहे ती तशीच ठेवावी, डॉलरचं मूल्य 85 पर्यंत पोहोचेल. दुसरीकडे RBI ने व्याजदरात वाढ करावी त्यामुळे कर्ज आणि EMI महाग होतील. असं केल्याने भारतीय कॅपिटल मार्केटमध्ये गुंतवणूक करणं अधिक वाढू शकतं. परदेशातील गुंतवणूकदार भारतात येतील. भारतात गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. तुम्हीही डिजिटल गोल्ड खरेदी करण्याचा विचार करताय? किती आहे रिस्क पाहा आपण आयातीवर 10 डॉलर खर्च करत असू तर इतकं सामान आपण निर्यातही करू शकतो. त्यामुळे परकीय चलनही स्थिर राहिल आणि रुपया मजबूत होईल असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

सर्वसामान्य लोकांना कसा बसतोय फटका? परदेशातून कच्चा तेल, डाळी आणि इतर वस्तू अशा रोजच्या वस्तू खरेदी करतो. डॉलर वाढला तर भारताला जास्त पैसे आयात करण्यासाठी मोजावे लागतात. परिणामी वस्तूंच्या किंमती वाढतात. सर्वसामान्यांचा ईएमआय महागणार . खर्च करण्यासाठी कमी पैसे हातात येतील. याचा मागणीवर मोठा परिणाम होईल. त्याचबरोबर सर्वसामान्यांप्रमाणेच सरकार आणि कंपन्यांवरही व्याजाचा बोजा वाढणार आहे. असं पहिल्यांदाच घडलंय असं नाही. २०१३ ते २०१६ या काळात रुपयाचं मूल्य घसरत होतं. काही काळ रुपया घसरुन स्थिर होत होता. यंदा गेल्या २० वर्षातील सगळेच रेकॉर्ड मोडले आहेत. सर्वात जास्त डॉलरचं मूल्य वाढलं आहे. 83 पर्यंत डॉलर पोहोचला आहेत तर रुपया नीचांकी पातळीवर गेला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या