मुंबई: कोविड-19चा प्रभाव कमी झाल्यामुळे आता कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये रेंटल हाउसिंग अर्थात भाडेतत्त्वावरच्या घरांना मागणी वाढली आहे. CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार दिल्ली, नोएडा, गुरुग्राम (दिल्ली एनसीआर) यांसारख्या भागांत कॉर्पोरेट क्षेत्रात अनेक जण काम करतात. कर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणाहून आपापल्या कार्यालयात परतले असल्याने गुरुग्राम आणि नोएडामध्ये प्रस्थापित मार्केटमधल्या भाड्यामध्ये सुमारे 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकीकडे मागणी वाढत असताना दुसरीकडे भाड्याच्या घरांच्या उपलब्धतेत लक्षणीय घट झाली आहे. कारण हे व्यवहार हाताळणारे रिअल इस्टेट गुंतवणूकदार नवीन ठिकाणी नवीन प्रकल्पांमधून होणारा नफा पुन्हा गुंतवण्यासाठी प्रस्थापित बाजारातून बाहेर पडले आहेत. या दरम्यान बांधकाम सुरू असलेल्या युनिट्सच्या वितरणासही विलंब होत आहे. ऑफिसेस पुन्हा सुरू झाल्यानंतर नोएडामध्ये घराचं भाडं 25 ते 30 टक्क्यांनी वाढलं आहे. महामारीच्या काळात 2 बीएचके फ्लॅटचं भाडं दरमहा 10 हजार रुपये होतं. ते आता 15 हजार रुपये झालं आहे.
वटवाघळं करत होते द्राक्षाचं नुकसान, शेतकऱ्याने अशी घडवली अद्दल पाहा PHOTO3 बीएचकेसाठी यापूर्वी 12 हजार रुपये भाडं होतं. परंतु, आता हाच दर 16 हजार ते 17हजार रुपये झाला आहे. नोएडामधल्या सेक्टर 137मध्ये स्टुडिओ अपार्टमेंट यापूर्वी 12 हजार रुपयांत भाडेतत्त्वावर उपलब्ध होत्या. आता तिथे दरमहा 17 हजार रुपये घरभाडं मागितलं जात आहे. 2 बीएचके युनिट्सचं भाडं दरमहा 15 हजार रुपयांवरून 18 हजार रुपये करण्यात आलं आहे. तसंच ग्रेटर नोएडा वेस्ट (नोएडा एक्स्टेंशन) येथे परवडणारा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. कारण गेल्या दोन ते तीन वर्षांत कोणताही नवीन निवासी प्रकल्प येथे आलेला नाही. या भागात घरभाडं साधारण 7 ते 10 हजार रुपयांदरम्यान आहे. कारणं गेल्या दोन वर्षांत कोविड-19 मुळे नव्या प्रकल्पांचा वेग मंदावला आहे. नोएडातले अनेक प्रोजेक्ट्स वेगवेगळ्या कारणांमुळे रखडले आहेत. गेल्या काही महिन्यांत लक्झरी सेगमेंट लाँच झाले आहेत. त्यामुळे परवडणाऱ्या घरांच्या युनिटच्या रेडी-टू-मूव्ह-इन युनिट्समध्ये घट झाली आहे. याशिवाय इंदिरापुरम किंवा नोएडाच्या सेक्टर 93सारख्या ठिकाणी जुने गुंतवणूकदार निघून गेले आहेत. ते नवीन ठिकाणी गुंतवणूक करून प्रकल्प आणण्याच्या तयारीत आहेत. माहितीनुसार, 2010मध्ये एका गुंतवणूकदाराचे इंदिरापुरममध्ये 3500 रुपये प्रति चौरस फूट दराने एक गृहनिर्माण युनिट होते. त्याने किमान पाच ते सहा वर्षं ते भाडेतत्त्वावर दिलं; मात्र जेव्हा त्याची किंमत सुमारे 10 हजार रुपये प्रतिचौरस फूटवर पोहोचली तेव्हा त्याने ती जागा विकून टाकली.
ना आधार ना वोटर आयडी, ‘JK Family ID’नं होणार लोकांची ओळख, वाचा फायदेकोणताही गुंतवणूकदार दिल्ली-एनआरसीमध्ये मालमत्ता खरेदी करतो, तेव्हा त्याचे योग्य मूल्य वाढत नाही तोपर्यंत तो ती राखून ठेवतो. जेव्हा त्याला योग्य ग्राहक मिळतो, तेव्हा ती प्रॉपर्टी विकून टाकतो. यामुळे मार्केटमध्ये भाडेतत्त्वावरच्या घरांची संख्या घटली असून, मागणी आणि पुरवठ्याचं संतुलन बिघडल्याने घरभाडं वाढलं आहे. या कालावधीत, प्रस्थापित बाजारपेठेतल्या भाडे पर्यायांमध्ये केवळ घट झालेली नाही, तर व्याजदरात वाढ झाल्याने विक्रीही मंदावली आहे. या भागातले बहुतांश जण वाट पाहण्याच्या विचारात आहेत. कारण त्यांची गृहकर्ज घेण्याची क्षमता कमी झाली आहे. गुरुग्राममधली स्थिती गुरुग्राममधल्या हाउसिंग सोसायट्यांमधलं घरभाडं 5000 रुपयांवरून 10 हजार रुपयांपर्यंत वाढलं आहे. एका थ्री बीएचकेचं मासिक भाडं 13 हजार रुपयांवरून 20 हजारांवर पोहोचलं आहे. काही ठिकाणी हा आकडा 50 हजार रुपयांच्याही पुढे गेला आहे. द्वारका एक्स्प्रेसवे परिसरातल्या सोसायट्यांकडे कल वाढल्याचं दिसून येतं. याचं कारण म्हणजे द्वारका एक्स्प्रेसवे टप्प्याटप्प्याने प्रवाशांसाठी खुला होईल आणि हरियाणातल्या 19 किलोमीटरचा टप्पा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीस पूर्णपणे कार्यान्वित होईल, असं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केलं आहे. या एक्सप्रेसवेचा काही टप्पा यापूर्वीच वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
गुरुग्राममध्ये दर्जेदार पुरवठा मर्यादित आहे आणि लक्झरी, चांगल्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सला मागणी जास्त आहे. या भागात बहुतांश बहुराष्ट्रीय कंपन्या असल्याने, कॉर्पोरेट क्लायंटच्या मागणीमुळे आणि कामाच्या ठिकाणाच्या जवळ असल्याने दिल्लीहून गुरुग्रामला स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या भागातलं घरभाडं 15 ते 20 टक्क्यांनी वाढलं आहे.