मुंबई, 27 जुलै : ऑनलाईन वेबसाईट्स आणि शॉपिंग अॅप्स प्रमोशन (Online Websites And Shopping Apps Pramotion) आणि मार्केटिंगसाठी (Marketing ) अगदी वेगळ्याच मार्गांचा अवलंब करतात. कितीदा तरी नेहमीचे पारंपरिक मार्ग किंवा गोष्टी सोडून सामाजिक धक्केही देतात. मात्र दरवेळेसच अशाप्रकारे मार्केटिंग केलेली प्रोडक्ट्स ग्राहकांना आवडतात असं नाही. आणि हल्ली ग्राहक आपली नाराजी थेट व्यक्तही करतात. अशाचप्रकारे ग्राहक सध्या फ्लिपकार्ट (Flipkart) कंपनीवर नाराज झालेत आणि Boycott Flipkart अर्थात फ्लिपकार्टवर बहिष्कार टाका असा ट्रेंड सध्या ट्विटरवर जोरदार सुरु असलेला पाहायला मिळत आहे. मंगळवार संध्याकाळपासून Flipkart वर ही टीकेची झोड उठणं सुरु झालं आहे आणि त्याला निमित्त ठरला आहे एक टी-शर्ट. हे टी-शर्ट डीप्रेशन या संकल्पनेवर तयार करण्यात आले आहेत. पण या टी शर्टवर डिप्रेशन दाखवण्यासाठी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) फोटो लावण्यात आला आहे. अर्थातच सुशांतच्या चाहत्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. Flipkart च्या वेबसाईटवर हे टीशर्ट विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.
या टीशर्टवर SSR चा फोटो आर्टवर्क करून लावण्यात आला आहे “Depression like drowning" असे शब्द त्यावर लिहिण्यात आले आहेत. हे टी शर्ट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं वेबसाईटवर शेअर झाल्यावर थोड्याच वेळात ही इमेज व्हायरल झाली आणि Boycott Flipkart हेही ट्रेंडिंग झालं. सुशांत सिंह हा प्रचंड लोकप्रिय अभिनेता होता. त्याच्या अकाली मृत्यूनंतर त्याच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता. त्याच्या प्रत्येक गोष्टीबद्दल त्याचे फॅन्स अत्यंत संवेदनशील आहेत.
आमिर खानमुळे झाला समंथा प्रभू-नागा चैतन्यचा घटस्फोट? प्रसिद्ध सेलेब्रिटीचा खळबळजनक दावा
या टी शर्टविरोधात ग्राहकांनी Flipkart वरच थेट नाराजी व्यक्त केली आहे. या टी शर्टवर दिशाभूल करणारा संदेश लिहिल्याबद्दल या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉटर्मला नोटीस पाठवण्यात आली आहे. “मी एक जबाबदार आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून Flipkart ला आज रात्री नोटीस पाठवणार आहे (एका मृत व्यक्तीची बदनामी करणारं साहित्य विक्रीसाठी परवानगी दिल्याबद्दल), असं एका युजरने ट्विटरवर लिहिलं आहे. “#Flipkart, एखाद्या मेलेल्या माणसाच्या नावावर तुम्ही तुमच्या उत्पादनाचं मार्केटिंग करू शकत नाही. त्यांच्या कुटुंबांचा जरातरी विचार करा. तुम्हाला कर्माची फळं लवकरच भोगावी लागतील,” असं एका युजरनं म्हटलं आहे.
देश अजूनही सुशांतच्या धक्कादायक मृत्युच्या धक्क्यातून सावरलेला नाही. न्यायासाठी आम्ही आमचा आवाज उठवतच राहणार आहोत. अशाप्रकारच्या कृत्याबद्दल Flipkart ला लाज वाटली पाहिजे आणि त्यांनी माफी मागितली पाहिजे. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी दिली पाहिजे. #Boycott Flipkart”, अशी मागणी एका युजरनं केली आहे. सुशांतच्या अनेक फॅनपेजवर याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत.
Neha Kakkar: नेहा कक्करने आयुष्यात पहिल्यांदाच बनवला ‘टॅटू’; यामध्ये नेमकं लिहलंय तरी काय?
यापूर्वी चिप्स आणि स्नॅक्सचा एक ब्रँडही असाच वादात सापडला होता. अभिनेता रणवीर सिंहनं या ब्रँडची जाहिरात केली होती. या जाहिरातीमुळे सुशांत सिंहचे फॅन्स दुखावले गेले होते. बिंगोच्या या जाहिरातीत रणवीर सिंग “बेटा, आगे क्या प्लॅन है?” असा प्रश्न विचारतो. हा प्रश्न कमालीचा हिट ठरला होता. या प्रश्नाला सुशांत सिंहचं कॅरेक्टर उत्तर देतं असं दाखवण्यात आलं होतं. हे कॅरेक्टर प्रकाशकण, पॅराडॉक्स, अल्गोरिदम, एलियन्स असं काही बोलून उत्तर देताना दाखवलं होतं. खरं तर ही जाहिरात दिसताना तरी वरवर निरुपद्रवी वाटत होती. त्यामध्ये सुशांत सिंहबद्दलचे थेट कोणतेही संदर्भ नव्हते. तरीही या जाहिरातीत रणवीरनं सुशांत सिंहची नक्कल केल्याचं त्याच्या फॅन्सचं म्हणणं होतं. अंतराळ विज्ञान हा विषय सुशांतच्या प्रचंड जिव्हाळ्याचा होता. त्यामुळे हे जाणीवपूर्वक केल्याचं फॅन्सचं म्हणणं होतं. “सुशांतला भौतिकशास्त्राचं चांगलं ज्ञान होतं. त्याची नक्कल करण्याची, खिल्ली उडवण्याची हिंमत केली. रणवीर, तू सुशांतवर जळत होतास. कारण सुशीनं लाखो लोकांचं हे प्रेम आणि आदर स्वत: कमावलेला होता. आणि त्याचे लाखो फॅन्स होते, म्हणून तुला त्याचा तिरस्कार वाटत होता?, रणवीर, मी तुला याबद्दल कधीही माफ करणार नाही,” असं एका संतापलेल्या फॅननं त्यावेळी लिहिलं होतं.
आता यावर फ्लिपकार्ट काय उत्तर देणं हे पाहणं महत्त्वाचं आहे.