JOIN US
मराठी बातम्या / मनी / राकेश झुनझुनवालांच्या हजारो कोटींच्या संपत्तीची मालकी कुणाकडे? मृत्यूपत्रात माहिती आली समोर

राकेश झुनझुनवालांच्या हजारो कोटींच्या संपत्तीची मालकी कुणाकडे? मृत्यूपत्रात माहिती आली समोर

राकेश झुनझुनवाला यांनी अनेक कंपन्यांमधील सुमारे 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक मागे सोडली आहे. त्यांनी अकासा एअर कंपनी देखील सुरु केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 ऑगस्ट : भारतीय शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचं 10 दिवसांपूर्वी 14 ऑगस्ट रोजी निधन झाले. राकेश झुनझुनवाला यांच्या निधनानंतर त्यांच्या हजारो कोटींच्या संपत्तीची जबाबदारी कुणाकडे असा प्रश्न सर्वानाच होता. त्यांच्या मालमत्तेचा मालक कोण असेल? आता याबाबत माहिती समोर आली आहे. राकेश झुनझुनवाला यांनी त्यांच्या मालमत्तेच्या मृत्यूपत्रात पत्नी रेखा, भाऊ राजीव गुप्ता, पुतण्या विशाल गुप्ता आणि विश्वासू वकील बरजीस देसाई यांची नावे दिली आहेत. सागर असोसिएट्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि झुनझुनवाला यांचे जवळचे मित्र देसाई यांनी त्यांना मृत्युपत्र बनवण्यात मदत केली. ET Nowने आपल्या एका अहवालात ही माहिती दिली आहे. Vegetables Rate Hike: आता भाज्यांमुळे घरखर्चाचं बजेट कोलमडणार, आठवडाभरात भाज्यांच्या दरात दुपटीने वाढ मालमत्तेची देखभाल करण्यासाठी ट्रस्टची स्थापना राकेश झुनझुनवाला यांच्या गुंतवणुकीच्या निर्णयांवर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांचे जवळचे सहकारी, डीमार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी, कल्पराज धरमशी आणि अमल पारीख यांना या ग्रुपचे सदस्य बनवण्यात आले आहे. राधाकिशन दमानी राकेश झुनझुनवाला यांच्या संपत्तीचे प्रमुख विश्वस्त असतील अशी बातमी समोर आल्यानंतर काही दिवसांनी मृत्युपत्राची बातमी आली आहे. LIC Policy: दररोज फक्त 47 रुपयांची गुंतवणूक करून लाखो रुपये मिळवा, जाणून घ्या डिटेल्स मुलांसाठी स्वतंत्र ट्रस्ट याशिवाय राकेश झुनझुनवाला यांनी आपली तीन मुलं निष्ठा, आर्यमन आणि आर्यवीरसाठी स्वतंत्र ट्रस्ट स्थापन केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी रेखा, भाऊ राजीव, त्यांचे पुतणे विशाल, देसाई आणि त्यांचे दीर्घकाळचे सहकारी उत्पल शेठ आणि अमित गोयल यांना या ट्रस्टचे विश्वस्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 30,000 कोटी रुपयांची संपत्ती राकेश झुनझुनवाला यांनी सुमारे तीन डझन कंपन्यांमधील सुमारे 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक मागे सोडली आहे. त्यांनी अकासा एअर कंपनी देखील सुरु केली आहे. अकासा एअरलाईनचे ते सह-संस्थापक होते. फोर्ब्सच्या मते, झुनझुनवाला यांची संपत्ती 5.8 अब्ज डॉलर एवढी होती, ज्यामुळे ते भारतातील 48 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या