रेल्वे बर्थ नियम
Where will you sit if there are two RAC passengers: ट्रेनमध्ये अनेकदा असं दिसतं की, रेल्वेचे नियम माहिती नसल्यामुळे लोक प्रवासादरम्यान एकतर स्वतः त्रस्त असतात किंवा इतरांना त्रास देतात. विशेषतः मीडल आणि साइट अपर आणि लोअर बर्थ संबंधित नियमांविषयी प्रवाशांमध्ये कन्फ्यूजन असते. ज्यामुळे अनेकदा प्रवासी आपसात भांडणं करत राहतात. ज्यावेळी साइड लोअरवर दोघांची RAC असेल अशा वेळी हे भांडण जास्त वाढते. यामध्ये साइड अपरवाला सर्वात मोठ्या दुविधेत अडकतो. ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट असूनही अनेकवेळा अशी सीट उपलब्ध होते ज्यामुळे आपण गडबडून जातो. कुठे बसायचे आणि कुठे झोपायचे हे प्रवाशांना समजत नाही. त्यामुळे, ट्रेनमध्ये प्रवास करण्यापूर्वी, त्याच्याशी संबंधित नियम जाणून घेणे देखील खूप महत्वाचे आहे, जेणेकरून प्रवासादरम्यान तुम्हाला किंवा इतर प्रवाशांना तुमच्यामुळे कोणतीही अडचण येऊ नये. Indian Railway: ट्रेन सुटल्यानंतर 10 मिनिटात दुसऱ्याला दिली जाते तुमची सीट? यावर सरकारने दिलं स्पष्टीकरण लाइड अपरवाला कुठे बसलाय खालच्या सीटवर दोन आरएसी तिकीट असलेले लोक असतील तेव्हा साइड कन्फर्म अपर बर्थचा पॅसेंजर कुठे बसेल. हा प्रश्न इतका गुंतागुंतीचा आहे की टीटीईही अनेकवेळा अस्वस्थ होतो. ज्या दोन लोकांना RAC दिले आहे ते आधीच बसले आहेत. अशा परिस्थितीत तिसऱ्या व्यक्तीला त्या सीटवर बसणे सोयीचे नसते. अशा परिस्थितीत, साइड लोअरवर RAC च्या लोकांना एकमेकांशी अॅडजस्ट करुन बसावे लागेल. दुसरीकडे, साइड अपरवाला व्यक्ती खाली बर्थ नंबरच्या हिशोबाने बसेल. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत वरच्या बर्थच्या प्रवाशाला खाली बसायचे असेल तर तो खालच्या सीटवर बसू शकतो. तरीही रेल्वेने कोणतेही नियम जारी केलेले नाहीत. जेव्हा अशी समस्या उद्भवते तेव्हा प्रवाशांनी सामंजस्य दाखवून आपसात जुळवून घेणे अपेक्षित असते. Railway : हे आहे जगातील सर्वात जास्त प्लॅटफॉर्म असणारं रेल्वे स्टेशन! एकाच वेळी उभ्या राहतात 44 ट्रेन 10 वाजेपर्यंत सीटवर बसता येईल रेल्वे तिकीट नियमानुसार रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत झोपण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार या काळात खालच्या बर्थवर बसलेले सर्व प्रवासी आपापल्या बर्थवर झोपतील. म्हणजेच, या काळात प्रवाशाच्या परवानगीशिवाय कोणीही खालच्या बर्थवर बसणार नाही. अशा प्रकारे बसण्यासाठी सकाळी 6 ते रात्री 10 ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. या दरम्यान, अपर आणि मीडल बर्थवाला लोअर बर्थवर बसेल. यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही.