JOIN US
मराठी बातम्या / मनी / WhatsApp ने जानेवारीत अचानक बंद केले 29 लाख अकाउंट, तुम्हीही करताय का ही चूक?

WhatsApp ने जानेवारीत अचानक बंद केले 29 लाख अकाउंट, तुम्हीही करताय का ही चूक?

WhatsApp Account Ban: युजर्सच्या तक्रारीच्या आधारे हे अकाउंट बंद करण्यात आल्याचे व्हॉट्सअॅपने म्हटले आहे. यापैकी 10 लाखांहून अधिक भारतीय अकाउंटवर सक्रियपणे बंदी घालण्यात आली आहेत.

जाहिरात

व्हॉट्सअप अकाउंट बॅन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

WhatsApp Account Ban: इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने 29 लाखांहून अधिक भारतीय अकाउंट एकाच वेळी ब्लॉक केले आहेत. हे अकाउंट 1 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान बंद करण्यात आले आहेत. युजर्सच्या तक्रारीच्या आधारे हे अकाउंट बंद करण्यात आल्याचे कंपनीने म्हटलेय. जवळपास 10,29,000 अकाउंट असे होते जी कंपनीने कोणत्याही रिपोर्टनंतर बंद केली. कारण ती भारत सरकारने घालून दिलेल्या नियमांचे आणि WhatsApp च्या धोरणाचे उल्लंघन करत होते. तुम्हीही चुकीच्या कामासाठी व्हॉट्सअ‍ॅप वापरत असाल, तर मेटा तुमच्या खात्यावरही कारवाई करू शकते. याआधी डिसेंबर 2022 मध्ये मेसेजिंग प्लॅटफॉर्मने देशातील 36 लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घातली होती. दर महिन्याला व्हॉट्सअ‍ॅप यूझर्स अनेक अकाउंटला रिपोर्ट करतात. ज्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप त्यांचा रिव्ह्यू करतात आणि ते बरोबर आढळल्यास खाते कायमचे ब्लॉक किंवा बंद करतात. व्हॉट्सअ‍ॅप अशा प्रकारची पावले उचलते जेणेकरून प्लॅटफॉर्म यूझर्ससाठी सुरक्षित करता येईल. जगभरात 2 अब्जाहून अधिक लोक व्हॉट्सअ‍ॅप वापरतात.

मोदी सरकारकडून गुडन्यूज! या लोकप्रिय स्कीमची मुदत वाढवली

तक्रारीच्या आधारे खात्यांवर बंदी

व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले की, जानेवारी महिन्यात कंपनीला भारतातून 1,461 तक्रारी मिळाल्या होत्या आणि प्लॅटफॉर्मने 195 तक्रारींवर कारवाई केली आहे. 1,461 तक्रारींपैकी 1,337 बंदी अपीलांसाठी होत्या आणि उर्वरित सपोर्ट आणि सिक्योरिटी संबंधित होत्या. कंपनीने IT कायदा 2021 च्या मासिक रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे.

आता आधार कार्डवर होणार नाही फसवणूक! UIDAI ने लॉन्च केले नवीन सेफ्टी फिचर

नवीन आयटी कायद्यांतर्गत कारवाई

नवीन आयटी नियमांतर्गत युजर्सची सुरक्षितता लक्षात घेऊन व्हॉट्सअ‍ॅपने या अकाउंट्सवर बंदी घातली आहे. IT कायदा 2021 अंतर्गत, 50 लाखांहून अधिक यूझर्स असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रत्येक महिन्याला आयटी मंत्रालयाला यूझर्स सेफ्टी रिपोर्ट सादर करावा लागतो.

डिसेंबरमध्ये एवढे अकाउंट झाले बॅन

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात व्हॉट्सअ‍ॅपने देशातील 36 लाखांहून अधिक अकाउंट बंद केले होते. जानेवारीमध्ये, व्हॉट्सअ‍ॅपला वेगवेगळ्या अकाउंटविषयी सुमारे 1,461 तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी 1,337 यूझर्सने अकाउंट बंद करण्याचे आवाहन केले होते, तर इतरांवर सपोर्ट आणि सेफ्टीबाबत तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या