JOIN US
मराठी बातम्या / मनी / मौल्यवान वस्तू ट्रेन किंवा विमानातच विसरलात? अशी मिळवता येईल परत

मौल्यवान वस्तू ट्रेन किंवा विमानातच विसरलात? अशी मिळवता येईल परत

दररोज लाखो भारतीय हे प्रवास करतात. काही ट्रेनने करतात तर काही लोक विमानाने प्रवास करतात. अशा वेळी मौल्यवान वस्तू अनेकदा हरवतात. त्या कशा मिळवता येतील याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

जाहिरात

हरवलेले सामान कसे मिळवावे?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 जानेवारी: विमान कंपनी किंवा रेल्वेकडून प्रवाशांचे सामान हरवल्याची अनेक प्रकरणे समोर येतात. तुम्हीही नियमित फ्लाइट किंवा ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्ही तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्यायला हवी. कारण सामान हरवल्यास तुम्हाला अडचणी येऊ शकतात. अशा परिस्थितीत, तुम्हाला उरलेल्या सामानातच अॅडजस्ट करावे लागेल किंवा खरेदीला जावे लागेल. पण हे सामान कसे मिळवायचे? याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

एयरपोर्टवर साहित्य राहिल्यास काय करावे?

तुम्ही विमानाने प्रवास करत असाल आणि एअरलाइन तुमचे सामान विमानतळावर लोड करायला विसरली तर काळजी करण्याची गरज नाही. कारण हरवलेल्या सामानाची भरपाई एअरलाइनकडून केली जाते. यासाठी तत्काळ एअरलाइन कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा. तुमचे सामान हरवल्याची तक्रार करा. गहाळ किंवा खराब झालेले सामान कंपनीला कळवा. प्रवाशांना विमानतळावरील एअरलाइनच्या डेस्कवर पॅसेंजर अनियमितता रिपोर्ट (PIR) दाखल करावा लागतो. रिपोर्ट फाइल केल्यानंतर, एअरलाइन त्वरित तुमचे सामान शोधून काढेल. सामान न मिळाल्यास प्रवासी क्लेम करू शकतात. आता बँक लोन मिळणे होणार सोपे! RBI गुडन्यूज देण्याच्या तयारीत  

रेल्वेत सामान हरवले तर काय करावे?

दरवर्षी हजारो रेल्वे प्रवाशांचे सामान ट्रेनमध्ये हरवते. अशा वेळी ते सामान परत मिळवणे एक मोठे आव्हान असते. प्रवाशांची ही अडचण लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने काही काळापूर्वी मिशन अमानत ही नवीन सेवा सुरू केली होती. रेल्वे सुरक्षा दल (RPF) रेल्वे प्रवाशांचे हरवलेले सामान शोधते. त्याअंतर्गत पश्चिम रेल्वेच्या वेबसाइटवर साहित्याचे फोटो आणि माहिती अपलोड केली जाते. त्यानंतर प्रवासी त्यांचे सामान ओळखू शकतात आणि परत मिळवू शकतात. आता कमी बजेटमध्ये करा लडाखची सैर! IRCTC देतेय खास संधी  

पश्चिम रेल्वेची वेबसाइट कोणती?

- http://wr.indianrailways.gov.in या वेबसाइटवर तुम्हाला जावे लागेल. - येथे ‘Mission Amanat – RPF’ टॅबवर क्लिक करा. - आरपीएफमध्ये हरवलेल्या मालाची माहिती असते. - तुम्हाला तुमची वस्तू वेबसाइटवर आढळल्यास, तुम्ही क्लेम करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या