रेल्वेचे नियम
नवी दिल्ली, 26 जुलै : ट्रेनमध्ये तसं तर सर्वच लोक प्रवास करतात. अनेकदा एकटे तर अनेकदा ग्रुपमध्ये मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत लोक प्रवास करतात. अशा वेळी मौजमजा करताना वेळ निघून जातो. पण रेल्वेने मौजमजेचे आणि झोपण्याचे नियम बनवले आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास प्रवाशांविरोदा कठोर कारवाई केली जाई. तुम्हीही नेहमीच ट्रेनने प्रवास करत असाल तर या नियमांविषयी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. अनेकदा ट्रेनमध्ये आवडीनुसार बर्थ मिळ नाही. कारण रेल्वेजवळ मर्यादित सीट असतात. अनेकदा मिडिल बर्थवर झोपण्यावरुनही वाद होतात. अशा वेळी प्रवास करताना कोणत्या नियमांचे पालन करायला हवेत हे माहिती असावं. भारतीय रेल्वे हे एक विस्तृत रेल्वे नेटवर्क आहे. या मार्गाने दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. त्यामुळे, प्रत्येक प्रवाशाला प्रवासाचा चांगला अनुभव मिळावा आणि रेल्वे नेटवर्क चांगले काम करेल याची खात्री करण्यासाठी हे नियम आहेत. याअंतर्गत रात्री मोठ्याने बोलणे, आवाज करणे, गाणी ऐकणे आता प्रवाशांना महागात पडणार आहे. नव्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवरही कडक कारवाई करण्यात येणार आहे. चालून थकाल पण प्लॅटफॉर्म संपणार नाही, जगातील सर्वात लांब 10 स्टेशन सोन्याचा नवीन नियम काय? रात्रीच्या प्रवासात पहिले प्रवासी जास्तीत जास्त 9 तास झोपू शकत होते. मात्र आता ही वेळ 8 तासांवर आणण्यात आली आहे. यापूर्वी रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत प्रवाशांना एसी कोच आणि स्लीपरमध्ये झोपण्याची परवानगी होती. पण रेल्वेच्या बदललेल्या नियमांनुसार आता तुम्हाला रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंतच झोपता येणार आहे. म्हणजेच आता झोपण्याची वेळ 8 तासांवर आली आहे. ज्या गाड्यांमध्ये झोपण्याची व्यवस्था आहे, त्या सर्व गाड्यांमध्ये हा बदल लागू होणार आहे. तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्हाला नवीन झोपण्याची वेळ पाळावी लागेल. याशिवाय, ट्रेन प्रवासादरम्यान, जर वरच्या किंवा मधल्या बर्थचा प्रवासी रात्री उशिरा तुमच्या बर्थवर बसला असेल, तर तुम्हाला झोपेचा त्रास होऊ शकतो. नियमांनुसार, तुम्ही या प्रवाशांना रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत त्यांच्या बर्थवर जाण्यास सांगू शकता. त्याचप्रमाणे, जर मधल्या बर्थवरील प्रवाशाने दिवसा त्याचा बर्थ उघडला तर तुम्ही त्याला नकार देऊ शकता. Royal Family: ब्रिटिश राजघराण्यापेक्षा 16 पटींनी श्रीमंत आहे हे कुटुंब! संपत्ती वाटली तर मिटेल अनेक देशांची गरिबी रेल्वेचे रात्रीचे नवीन नियम कोणताही प्रवासी त्याच्या सीट, डब्यात किंवा कोचमध्ये मोबाईलवर मोठ्याने बोलू शकत नाही. कोणताही प्रवासी इअरफोनशिवाय मोठ्या आवाजात गाणे ऐकू शकत नाही. रात्री 10 नंतर कोणत्याही प्रवाशाला लाइट लावू दिले जाणार नाहीत. रेल्वे सेवांमध्ये ऑनलाइन जेवण रात्री 10 नंतर मिळणार नाही. मात्र, ई-कॅटरिंग सेवेसह तुम्ही रात्रीच्या वेळीही ट्रेनमध्ये तुमचे जेवण किंवा स्नॅक्स प्री-ऑर्डर करू शकता. तसेच, ट्रेनच्या डब्यांमध्ये धूम्रपान, मद्यपान आणि इतर कोणत्याही क्रियाकलाप आणि कोणतीही ज्वलनशील वस्तू वाहून नेण्याची परवानगी नाही आणि ते भारतीय रेल्वेच्या नियमांच्या विरुद्ध आहेत.