JOIN US
मराठी बातम्या / मनी / Investment Tips: काय आहे राकेश झुनझुनवालांच्या यशाचे रहस्य? गुंतवणुकीचे हे 5 नियम पाळाल तर व्हाल श्रीमंत

Investment Tips: काय आहे राकेश झुनझुनवालांच्या यशाचे रहस्य? गुंतवणुकीचे हे 5 नियम पाळाल तर व्हाल श्रीमंत

Rakesh Jhunjhunwala’s 5 Investment Strategies: राकेश झुनझुनवाला गुंतवणूकदारांना सल्ला देताना म्हणायचे की, स्वतः संशोधन करा, योग्य स्टॉक विकत घ्या आणि मग त्यावर चिकटून रहा. कंपनीच्या व्यवसायावर विश्वास ठेवा आणि घाबरून कोणताही निर्णय घेऊ नका.

जाहिरात

Investment Tips: काय आहे राकेश झुनझुनवालांच्या यशाचे रहस्य? गुंतवणुकीचे हे 5 नियम पाळाल तर तुम्हीही व्हाल श्रीमंत

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 ऑगस्ट: ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे काल सकाळी वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले. झुनझुनवाला नेहमीच आशावादी होते आणि त्यांना विश्वास होता की बाजारपेठेतील सर्वोत्तम काळ येणं अद्याप बाकी आहे. भारतीय बाजार आणि त्यांच्या गुंतवणूक धोरणाच्या बळावर ते शेअर बाजारातील बिग बुल बनले. राकेश झुनझुनवाला भारताच्या भविष्याबद्दल नेहमीच खूप आशावादी होते. ते आपल्या पोर्टफोलिओमध्ये अशा कंपन्या ठेवत असत, ज्यांना भारतातील जलद बदल आणि वाढीचा फायदा होईल. ते केवळ ट्रेडरच नव्हते तर गुंतवणूकदारही होते. मंदीच्या काळातही बाजारभावाविरुद्ध व्यापार करण्याचं धाडस त्यांच्यात होतं. यामुळे त्यांनी अनेक प्रसंगी प्रचंड नफाही कमावला. आज आपण बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्या गुंतवणूक रणनीतीबद्दल बोलणार आहोत, ज्याच्या जोरावर त्यांनी हे स्थान मिळवलं आहे. ते कोणत्या 5 खास स्ट्रॅटेजीज फॉलो करत (Rakesh Jhunjhunwala’s 5 Investment Strategies**)** होते ते जाणून घेऊया. 1. योग्य ठिकाणी गुंतवणूक करा आणि प्रतीक्षा करा- झुनझुनवाला नेहमीच योग्य खरेदी आणि प्रतीक्षा करण्यावर विश्वास ठेवत. स्वतः संशोधन करा, योग्य स्टॉक विकत घ्या आणि मग त्यावर चिकटून राहा, यावर त्यांचा विश्वास होता. कंपनीच्या व्यवसायावर विश्वास ठेवा. घाबरून कोणताही निर्णय घेऊ नका. 2. तुमच्या स्टॉकबद्दल भावनिक होऊ नका- जेव्हा राकेश झुनझुनवाला 50 वर्षांचे झाले, तेव्हा त्यांना एका पत्रकाराने विचारले की, एक गुंतवणूकदार म्हणून ते कधी कधी त्यांच्या कोणत्याही स्टॉकबद्दल भावनिक होतात का? प्रत्युत्तरादाखल ते म्हणाले की जर त्यांना काही भावना असतील तर त्या मुलांसाठी आणि त्यांच्या पत्नीसाठी आणि त्यांच्या मित्रमैत्रिणींसाठी होत्या. ते म्हणाले की ते त्यांच्या कोणत्याही स्टॉकबद्दल कधीच भावनिक होत नाही. झुनझुनवाला यांच्या गुंतवणूक तत्त्वज्ञानाचे हे सार आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करा (सामान्यत: दीर्घ मुदतीसाठी), पण तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल, तर तुमच्या स्टॉकबद्दल कधीही उत्कटता बाळगू नका आणि गरजेनुसार योग्य वेळ आल्याशिवाय विकू नका. हेही वाचा-  PM Modi Investment Savings Tips: ‘या’ सरकारी योजनेत आहे पंतप्रधान मोदींची गुंतवणूक, असा ठेवतात पैशांचा हिशोब 3. धीर धरा, यश निश्चित आहे- ग्रोवच्या मते झुनझुनवाला एका दिवसात इतके श्रीमंत झाले नाहीत. ते जिथे होते तिथे पोहोचण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे संशोधन आणि मेहनत केली आहे. झुनझुनवालाच्या पोर्टफोलिओमध्ये 25-30 टक्के अनेक वेळा दुरुस्त्या झाल्या आहेत, परंतु त्यांनी नेहमी सुधारणांना खरेदीची संधी म्हणून वापरलं. 4. जेव्हा इतर विकत असतील तेव्हा खरेदी करा आणि जेव्हा इतर खरेदी करत असतील तेव्हा विक्री करा- झुनझुनवाला यांचा असा विश्वास होता की जेव्हा इतरांनी त्यांचे शेअर्स विकत असतील तेव्हा खरेदी केले पाहिजे आणि जेव्हा इतरांनी खरेदी केली असेल तेव्हा विकावे. अशा प्रकारे, ते गर्दीच्या मानसिकतेच्या विरुद्ध होता आणि गुंतवणूक करताना बाजारातील गुंतवणूकदारांनी त्यांच्या मेंदूचा वापर करावा अशी त्यांची इच्छा होती. 5. योग्य मूल्यांकनानुसार गुंतवणूक करा- कधीही अवास्तव मुल्यांकनात गुंतवणूक करू नका. झुनझुनवाला यांचा असा विश्वास होता की ज्या कंपन्या बातम्यांमध्ये आहेत त्यावर कधीही पैज लावू नका. अशाप्रकारे जेव्हाही तुम्ही अवास्तव मूल्यांकनावर स्टॉक ट्रेडिंग पाहाल तेव्हा ते खरेदी करणे टाळा. अन्यथा, तुम्ही तुमचे कष्टाचे पैसे गमावू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या