मुंबई, 12 सप्टेंबर : खासगी नोकरीत एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत नोकरी बदलने ही सामान्य बाब आहे. नवीन कंपनीत नोकरी करताना तुमचे नवीन पीएफ खाते त्या कंपनीत तयार होते. परंतु तुमचा UAN क्रमांक कधीही बदलत नाही आणि तो नेहमी खाते क्रमांक असतो. पण नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यांचे काय होते? नियमांनुसार तुमचे जुने EPF खाते नवीन कंपनीकडे ट्रान्सफर करा. असे न झाल्यास भविष्यात तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागू शकतो. 36 महिने पैसे जमा न केल्यास खाते बंद होते EPFO खात्यात सलग 36 महिने पैसे जमा न केल्यास ते खाते बंद होते. ते खाते इन-ऑपरेटिव्ह खाते म्हणून मानले जाते. समजा तुम्ही नवीन कंपनीत नोकरी जॉईन केली आहे परंतु तुम्हाला तुमचे EPFO खाते नवीन कंपनीत ट्रान्सफर करता आले नाही. अशा परिस्थितीत, त्या खात्यात पैसे जमा होत नाहीत आणि जर हीच समस्या 36 महिने चालू राहिली, तर ते खाते निष्क्रिय मानले जाते. जरी ते तुमच्या UAN अंतर्गत राहतो पण त्यात पैसे नाही त्यामुळे ते खाते बंद होते. अशा परिस्थितीत तुमचे खाते अनेक वर्षे असेच राहते.
Fixed Deposit: फिक्स्ड डिपॉझिटमधील गुंतवणूक सुरक्षित, मात्र तुमचं नुकसान कसं होतं समजून घ्या
खाते ट्रान्सफर करा
सरकारने लोकांच्या सोयी लक्षात घेऊन काही विशेष नियम केले आहेत. तुम्ही नोकरी बदलताच तुमचे खाते ट्रान्सफर करून खाते निष्क्रिय होण्यापासून टाळण्याचा हा एकमेव मार्ग आहे. जर तुम्ही ते पैसे नंतर काढले तर तुम्हाला कर देखील भरावा लागेल. आजच्या काळात सर्व काही खूप सोपे झाले आहे. तुम्ही घरबसल्या सहज खाते ट्रान्सफर करू शकता. तुमच्या हितासाठी सरकारने बनवलेले नियम तुम्ही पाळा. नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीने EPFO बॅलन्ससाठी अर्ज केला नाही, तर त्याला इन-ऑपरेटिव्ह मानले जाईल. त्यांच्या अंतर्गत चार नियम करण्यात आले आहेत. 1. कोणत्याही कंपनीतून निवृत्त झाल्यानंतर, 36 महिने ते 55 वर्षे वयापर्यंत, जर तुम्ही EPF शिल्लक काढण्यासाठी अर्ज केला नाही, तर खाते बंद केले जाईल. 2. जर एखादी व्यक्ती कायमस्वरूपी परदेशात गेली आणि तिथे राहिली. 3. EPFO खातेधारकाचे निधन झाल्यास. 4. जर सदस्याने त्याचे सर्व निवृत्तीचे पैसे काढले तर. #कायद्याचं बोला: खात्यातून 300 रुपये झाले वजा! विद्यार्थ्याने RBI निमयांच्या मदतीने कसे मिळवले तब्बल 9600 रुपये ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीचे पैसे ट्रान्सफर केले जातात EPFO मध्ये पडून असलेल्या तुमच्या पैशावर सदस्याचे वय 58 वर्षे होईपर्यंत व्याज मिळते. ज्या वर्षी EPFO चे पैसे काढले जातात त्या वर्षात सदस्याला जर सदस्य करपात्र उत्पन्नाखाली येत असेल कर भरावा लागतो. पीएफ खात्यातील पैसे 7 वर्षांपर्यंत काढले नाहीत, तर ते पैसे ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीमध्ये ट्रान्सफर केले जातात. निधीची माहिती दरवर्षी 30 सप्टेंबर रोजी दिली जाते. 25 वर्षे या फंडात पैसे राहतात. तुम्ही 25 वर्षांच्या आत निधीचा क्लेम करू शकता. जर तुम्ही 25 वर्षांच्या आत या निधीवर दावा केला नाही, तर हे पैसे भारत सरकारकडे जमा होतात.