JOIN US
मराठी बातम्या / मनी / IRCTC चं खास टूर पॅकेज! स्वस्तात करुन या अयोध्या, काशी आणि गयाची सैर

IRCTC चं खास टूर पॅकेज! स्वस्तात करुन या अयोध्या, काशी आणि गयाची सैर

IRCTC चे हे टूर पॅकेज 26 जूनपासून सुरू होणार आहे. टूर पॅकेजमध्ये प्रवासी फ्लाइट मोडमध्ये प्रवास करतील. हे टूर पॅकेज बेंगळुरूपासून सुरू होणार आहे.

जाहिरात

अयोध्या टूर पॅकेज

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

IRCTC Tour Package: आयआरसीटीसीने प्रवाशांसाठी एक नवीन टूर पॅकेज आणलं आहे. ज्यामध्ये अयोध्या, काशी आणि गयाची सैर केली जाईल. IRCTC चे हे टूर पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांचे आहे. या IRCTC टूर पॅकेजचे नाव पवित्र अयोध्या विथ गया, काशी आणि प्रयागराज एक्स बेंगळुरू (SBA23) आहे. या टूर पॅकेजमध्ये पर्यटक वाराणसी, प्रयागराज आणि सारनाथलाही भेट देणार आहेत. हे टूर पॅकेज 26 जूनपासून सुरू होणार आहे IRCTC चे हे टूर पॅकेज 26 जूनपासून सुरू होणार आहे. टूर पॅकेजमध्ये प्रवासी फ्लाइट मोडमध्ये प्रवास करतील. हे टूर पॅकेज बेंगळुरूपासून सुरू होणार आहे. आयआरसीटीसीच्या इतर टूर पॅकेजप्रमाणे या टूर पॅकेजमध्येही प्रवाशांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था रेल्वेकडून मोफत केली जाणार आहे. या टूर पॅकेजमध्ये पर्यटकांना या धार्मिक स्थळांना स्वस्तात आणि सुविधांसह भेट देता येणार आहे. IRCTC Tour Package: तिरुपतीपासून त्रिवेंद्रमपर्यंत, फक्त 19,620 रुपयांत 11 दिवसांच पॅकेज; सोडू नका ही संधी IRCTC च्या या टूर पॅकेजचे भाडं किती? IRCTC च्या अयोध्या, गया, प्रयागराज, सारनाथ आणि वाराणसी टूर पॅकेजचे भाडेही कमी आहे. या टूर पॅकेजमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 40,900 रुपये खर्च करावे लागतील. या टूर पॅकेजमध्ये तुम्ही दोन लोकांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 33,550 रुपये भाडे द्यावे लागेल. दुसरीकडे, जर तुम्ही या टूर पॅकेजमध्ये तीन लोकांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 31,700 रुपये मोजावे लागतील. IRCTC: चार धाम यात्रेला जायचंय? आयआरसीटीसीने आणलंय खास पॅकेज, पाहा कधी होतंय सुरु IRCTC च्या या टूर पॅकेजचे बुकिंग आणि त्याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊ शकता. विशेष म्हणजे, IRCTC पर्यटकांसाठी विविध टूर पॅकेजेस ऑफर करत असते. या टूर पॅकेजच्या माध्यमातून प्रवासी स्वस्तात आणि सोयीनुसार प्रवास करतात आणि पर्यटनालाही चालना मिळते. तुम्हाला अयोध्या, काशी आणि वाराणसी सारख्या धार्मिक स्थळांना भेट द्यायची असेल, तर हे IRCTC टूर पॅकेज तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या