मुंबई, 28 सप्टेंबर : उद्यापासून (29 सप्टेंबर) नवरात्र सुरू होतेय. तुम्हाला खास प्लॅनिंग करावं लागेल. कारण ऑक्टोबर महिन्यात बँकेला भरपूर सुट्ट्या आहेत. दसरा, दिवाळी असे मोठे सण ऑक्टोबरमध्ये येतायत. आणि ऑक्टोबरमध्ये 11 दिवस बँकांना सुट्टी आहे. त्यामुळे तुम्हाला बँकांची कामं आटपावी लागतील. कधी कधी असतील बँका बंद? 1. ऑक्टोबरमध्ये सुरुवातीला 2 तारखेला सुट्टी असेल. 2 ऑक्टोबरला गांधी जयंती. त्यानंतर लगेच 6,7 आणि 8 ऑक्टोबरला बँकांचं काम बंद असेल. पितृपक्षामुळे सोन्या-चांदीची मागणी घटली, ‘हे’ आहेत शुक्रवारचे दर 2. 6 ऑक्टोबरला रविवार असल्यानं बँका बंद असतील. 3. 12 ऑक्टोबरला महिन्यातला दुसरा शनिवार आहे. त्यामुळे बँकांना सुट्टी आहे. 4. 13 ऑक्टोबर तर हक्काचा दिवस. म्हणजे रविवार. त्यामुळे बँका बंद. मारुतीच्या या कारची तब्बल 1 लाख रुपये कमी झाली किंमत, जाणून घ्या काय आहे कारण 5. महिन्याच्या शेवटी चार दिवस सुट्टी आहे. 20 ऑक्टोबरला रविवार आहे. 6. 26 ऑक्टोबर हा महिन्यातला चौथा शनिवार आहे. त्यादिवशी बँकेचे व्यवहार बंद ‘या’ तारखेपर्यंत भरू शकता इन्कम टॅक्स रिटर्न, CBDT नं वाढवली डेडलाइन 7. त्यानंतर 27 ऑक्टोबर रविवार आणि दिवाळी. सगळीकडे उत्सवी वातावरण. 8. 28 ऑक्टोबरला दिवाळीचा पाडवा. बँका बंद आहेत. 9. 29 ऑक्टोबर भाऊबिज. त्यादिवशीही बँकांना सुट्टी आहे. एकूणच या महिन्यात सुट्ट्यांचा सुकाळ आहे. सणवार असल्यानं सगळीकडे उत्सवी वातावरण आहे. तुम्ही आधीच चांगलं प्लॅनिंग करा. म्हणजे चांगलं एंजाॅय करू शकाल. विशेष म्हणजे बँका बद असल्यानं बँकांची कामं अगोदर करा. पवार कुटुंबात खरंच गृहकलह? मनोहर जोशी काय म्हणाले, पाहा UNCUT VIDEO