मुंबई, 31 ऑगस्ट : क्रेडिट कार्डवर तुमच्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च करू नका असं तज्ज्ञ नेहमी सांगतात. क्रेडिट कार्ड कंपन्यांना तुमचा खर्च आणि मिळकत यातील अंतर चांगले समजते. यामुळेच या कंपन्या तुम्हाला एक सुविधा देतात, जी मिनिमम अमाऊंट ड्यु असते. तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल काळजीपूर्वक पाहिल्यास तुम्हाला बिलाची संपूर्ण रक्कम दिसेल. तसेच पुढील बॉक्समध्ये Minimum Amount Due चा पर्याय देखील दिसेल. मिनिमम अमाऊंट ड्यु म्हणजे जर तुम्ही संपूर्ण बिल भरण्यास असमर्थ असाल तर तुम्ही ही रक्कम देखील भरू शकता. मिनिमम अमाऊंट ड्यु भरून निश्चिंत राहू नका जर तुम्ही महिन्याच्या बिलात मिनिमम अमाऊंट ड्यु भरली म्हणजे तुमची क्रेडिट कार्ड बिलातून सुटका झाली असं नाही. हा एक प्रकारचा कर्जाचा सापळा आहे. कंपनी तुमच्याकडून दर महिन्याला मिनिमम अमाऊंट ड्युच्या नावाखाली जे पैसे घेते, ते फक्त व्याज आणि फाइल चार्जेसमध्ये वापरले जाते. तुमची मूळ रक्कम तशीच राहते. तिशी गाठली तरी रुपयाचीही बचत नाही? ‘या’ सरकारी योजनेत करा गुंतवणूक मिळेल दीड लाख रुपये पेन्शन किमान देय रक्कम ही तुमच्या एकूण बिलाचा एक भाग आहे. हे तुम्हाला क्रेडिट कार्ड विलंब शुल्कासारख्या अतिरिक्त दंडांपासून आराम देते. परंतु तुम्हाला संपूर्ण बिलावर दरमहा सुमारे 3 ते 4% भरावे लागतील. त्यानुसार, तुम्हाला वार्षिक सुमारे 40 ते 50 टक्के व्याज द्यावे लागेल. तेही तुम्ही खरेदी केल्याच्या दिवसापासून भरावे लागेल. साधारणपणे मिनिमम अमाऊंट ड्यु तुमच्या एकूण थकबाकीच्या 5% असते. परंतु ही रक्कम विविध क्रेडिट कार्डमध्ये बदलू शकते. तुमच्या क्रेडिट कार्ड बिलावरील एकूण थकबाकी जास्त असल्यास, ती त्या रकमेच्या पाच टक्क्यांपेक्षा कमी असू शकते. जर एकूण बिलाची रक्कम कमी असेल तर ती देखील सुमारे पाच टक्के असू शकते. PM Kisan Yojna: ‘या’ शेतकऱ्यांना 12वा हप्ता 2000 नाही 4000 रुपयांचा येईल, काय आहे कारण? क्रेडिट कार्ड बिलामध्ये देय असलेली मिनिमम अमाऊंट ड्यु भरल्यास तुम्ही कर्जाच्या सापळ्यात अडकू शकता. कारण, ही रक्कम व्याज भरण्यासाठी वापरली जाते, मूळ रक्कम भरण्यासाठी नाही. तुम्ही तुमची देय रक्कम पूर्णपणे भरेपर्यंत व्याज आकारले जाईल. त्याच वेळी, तुम्हाला 50 टक्क्यांपर्यंत व्याज द्यावे लागेल. CIBIL खराब होईल बर्याचदा बँका तुम्हाला सांगतात की तुम्ही मिनिमम अमाऊंट ड्यु भरल्यास CIBIL स्कोअर बिघडत नाही. परंतु तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जेव्हा तुमची कर्जाची रक्कम कमी होण्याऐवजी तशीच राहते किंवा वाढतच जाते, तेव्हा CIBIL स्कोअर खराब होतो.