2 हजार रुपयांच्या नोटा बंद होणार
नवी दिल्ली, 19 मे : आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे तुमच्याकडे 2 हजार रुपयांच्या नोटा असतील तर त्या तुम्हाला बँकेत जाऊन बदलाव्या लागणार आहेत. आरबीआयने शुक्रवारी परिपत्रक काढून 2 हजार रुपयांच्या नोटा बंद करत असल्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर 2016 साली 2 हजार रुपयांच्या नोटा चलनात आल्या होत्या. 2 हजारांच्या नोटा आरबीआय अॅक्ट 1934 सेक्शन 24 (1) अंतर्गत आणल्या गेल्या होत्या. जुन्या 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर नोटांची तूट होऊ नये म्हणून 2 हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या होत्या. दुसऱ्या नोटा बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर 2 हजार रुपयांच्या नोटांचं उद्दीष्ट संपलं होतं, त्यामुळे 2018-19 सालीच 2 हजारांच्या नोटांची छपाई बंद झाली होती. कशा बदलाल नोटा? आरबीआयच्या परिपत्रकानुसार 2 हजार रुपयांच्या नोटा तुमच्या बँकेत जाऊन जमा करता येतील किंवा या नोटांच्या बदल्यात दुसऱ्या नोटाही घेता येतील. 23 मे 2023 पासून बँकेत जाऊन 2 हजार रुपयांच्या नोटा बदलता येईल, पण एकावेळी फक्त 20 हजार रुपयेच जमा करता येणार आहेत.
2016 साली देशभरात नोटबंदी झाल्यानंतर 500 आणि एक हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या. या नोटाबंदीमुळे तूट भरून काढण्यासाठी आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नोटांच्या छपाईला सुरूवात केली. 2018-19 सालीच आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली होती. 2000 च्या नोटा कधी जारी झाल्या? नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट जारी केली. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर सर्व 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या. या चलनांऐवजी रिझर्व्ह बँकेने 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा जारी केल्या होत्या. चलनातून बाहेर काढलेल्या नोटांचे मूल्य 2000 रुपयांची नोट सहज भरून काढेल असा रिझर्व्ह बँकेचा विश्वास होता. अहवालानुसार, 2000 रुपयांच्या नोटेमुळे उर्वरित नोटांची गरज कमी झाली होती. नोटा बंद झाल्या आहेत का? 31 मार्च 2017 पर्यंत, चलनात असलेल्या नोटांच्या एकूण मूल्यामध्ये 2000 रुपयांच्या नोटांचा वाटा 50.2 टक्के होता. त्याच वेळी, 31 मार्च 2022 रोजी चलनात असलेल्या एकूण नोटांच्या मूल्यात 2000 रुपयांच्या नोटांचा वाटा 13.8 टक्के होता. रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट बंद केली नसली तरी ती छापली जात नाही. 2000 च्या नोटा कधीपासून छापल्या गेल्या नाहीत? 2000 च्या नोटा 2017-18 मध्ये देशात सर्वाधिक चलनात होत्या. यादरम्यान बाजारात 2000 च्या 33,630 लाख नोटा चलनात होत्या. त्यांची एकूण किंमत 6.72 लाख कोटी रुपये होती. 2021 मध्ये मंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत माहिती दिली होती की, गेल्या 3 वर्षांपासून 2000 रुपयांची एकही नोट छापण्यात आलेली नाही. वास्तविक, आरबीआयशी बोलल्यानंतर सरकार नोटांच्या छपाईबाबत निर्णय घेते. एप्रिल 2019 पासून रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची एकही नोट छापलेली नाही. 2000 रुपयांच्या नोटांची छपाई न झाल्यामुळे त्या आता लोकांच्या हातात कमी दिसत आहेत. त्यामुळेच एटीएममधून या नोटा फार कमी वेळा बाहेर पडत आहेत. अखेरीस आता रिझव्र्ह बँकेनं 2000 रुपयांची नोटा छपाई करण्याचे आता बंद करणार आहे.