मुंबई : ट्विटरची सूत्र एलन मस्क यांच्याकडे आल्यानंतर एकामागे एक धक्के मिळायला सुरुवात झाली आहे. आधी ब्लू टिकसाठी पैसे आकारले. नंतर कर्मचाऱ्यांच्या कपातीचे संकेत दिले. कर्मचाऱ्यांना 12 तास काम करण्याच्या सूचना दिल्या आणि आता चक्क कर्मचाऱ्यांना मेल करून त्यांना कामावरून कमी केलं. ट्विटर कंपनीने कर्मचाऱ्यांना भयानक मेल केला आहे. हा मेल आला म्हणजे समजायचं तुमची नोकरी गेली आहे. त्यामुळे तुम्ही ऑफिसला जायची गरज नाही. पहिल्याच टप्प्यात जवळपास २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. काय म्हटलंय मेलमध्ये नोकरी राहिली नाही तर तुमच्या ई-मेलवर नोटिफिकेशन येणार आहे. कर्मचाऱ्यांना ट्विटरकडून एक मेल आला आहे. मेलमध्ये लिहिले होते की, “ट्विटरला चांगल्या टप्प्यावर घेऊन जाण्यासाठी आम्ही काही कठीण निर्णय घेत आहोत. आमच्यासाठी देखील हे निर्णय घेणं थोडं कठीण आहे. ट्विटर साठी आपले महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होईल.
12 तास आणि आठवड्याचे 7 दिवस काम, ट्वीटर कर्मचाऱ्यांसाठी नव्या बॉसनं कडक केले नियमदुर्दैवाने ट्विटरला यशाच्या मार्गावर नेण्यासाठी हा निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही स्पॅम फोल्डरने तुमचा मेल चेक करा. जर तुमच्या कामावर परिणाम झाला नसेल तर तुम्हाला तुमच्या ट्विटर ई-मेलद्वारे एक सूचना मिळेल. जर तुम्हाला कामावरून काढलं असेल तर ई मेलद्वारे नोटिफिकेशन मिळेल. शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ट्विटर-hr@ कोणताही मेल आला नाही, तर मेल peoplequestions@twitter.com वर तुम्ही मेल करा असं ई मेलमध्ये लिहिण्यात आलं आहे.
ट्विटरवर ‘ब्लू टिक’साठी पैसे द्यावे लागल्यास वापरकर्त्यांसाठी Koo ठरेल का नवं ‘घरटं’? काय सांगतात तज्ज्ञ?तुम्ही जर ऑफिसला निघाला असाल रस्त्यात असाल किंवा ऑफिसमध्ये असाल तर घरी जा. हा काळ सर्वांसाठीच आव्हानात्मक आहे. तुमची नोकरी टिकली तरी आणि नाही राहिली तरी देखील असं या मेलमध्ये उल्लेख केला आहे. आज ट्विटरचं ऑफिस बंद राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.