JOIN US
मराठी बातम्या / मनी / तुमच्याकडे हे सर्टिफिकेट नसेल तर मिळणार नाही पेट्रोल-डिझेल

तुमच्याकडे हे सर्टिफिकेट नसेल तर मिळणार नाही पेट्रोल-डिझेल

तुमच्याकडे आहे का हे सर्टिफिकेट आताच चेक करा, नाहीतर मिळणार सणासुदीला मिळणार नाही पेट्रोल डिझेल, सरकारनं काढलाय नियम

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली : बऱ्याचदा गाडीसोबत कागदपत्र ठेवणं टाळाटाळ केली जाते. कधीकधी ऑनलाईन सर्टिफिकेट ठेवली जातात. काही कागदपत्रांची मुदत संपली की नाही हे पाहायची देखील आठवण राहात नाही. मात्र आता हे सगळे नियम सणासुदीच्या काळात अधिक कठोर करण्यात आले आहेत. तुमच्याकडे एक सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला १० हजार रुपयांचा दंड आणि याशिवाय पेट्रोल-डिझेल देखील मिळणार नाही असा नियम काढण्यात आला आहे. हा नियम जरी सध्या दिल्लीपुरता असला तरी पुढच्या काही महिन्यात मुंबई आणि महाराष्ट्रात यायला वेळ लागणार नाही. दिल्लीमध्ये प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी अरविंद केजरीवाल यांचं सरकार प्रयत्न करत आहे. त्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. PUCC सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे. 25 ऑक्टोबरपासून प्रत्येक पेट्रोल पंपावर हे सर्टिफिकेट दाखवल्याशिवाय पेट्रोल मिळणार नाही असा नियम आणला आहे.

पेन्शन सुरू ठेवण्यासाठी द्यावे लागणार जीवन प्रमाणपत्र; सर्टिफिकेट मिळवण्याचे 6 पर्याय

ज्यांच्याकडे हे सर्टिफिकेट नसेल त्यांना १० हजार रुपयांचा दंड आकारला जाईल अशी शिक्षा आहे. 25 ऑक्टोबरनंतर ज्या चालकांकडे व्हॅलीड पीयूसी सर्टिफिकेट नसेल, त्याला इंधन मिळणार नाही. दिल्ली परिवहन विभागाने वाहन मालकांना गैरसोय आणि कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी निर्धारित तारखेपूर्वी वैध PUCC प्राप्त करण्यास सांगितले आहे. वैध PUCC शिवाय वाहन चालवल्यास 10,000 रुपये दंड आणि तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, असे परिवहन विभागाने नोटीसमध्ये म्हटले आहे. दिवाळीआधी टाकी फुल्ल करण्यापेक्षा PUCC सर्टिफिकेट काढण्याकडे अधिक लक्ष द्या. याशिवाय गाडीची कागदपत्रही नीट आहेत का ते तपासा.

Petrol Diesel Prices: या शहरांमध्ये स्वस्त झाले पेट्रोल-डिझेलचे दर, पाहा आजचे दर

संबंधित बातम्या

दिवाळीआधी जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. महागाई वाढत असताना तुमच्या खिशाला तुमच्याच चुकीने भुर्दंड पडणार नाही याची काळजी घ्या. याशिवाय नियम मोडल्यास सक्त कारवाई करण्याचे आदेश ट्रॅफिक पोलिसांना देण्यात आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या