JOIN US
मराठी बातम्या / मनी / World Gold Reserves: सर्वाधिक सोन्याचा साठा असलेले टॉप 10 देश, भारत कितव्या स्थानी? चेक करा

World Gold Reserves: सर्वाधिक सोन्याचा साठा असलेले टॉप 10 देश, भारत कितव्या स्थानी? चेक करा

Top 10 largest World Gold Reserves: एखाद्या देशाकडे सोन्याचा साठा जितका जास्त तितका तो देश आर्थिकदृष्ट्या स्थिर मानला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की जगातील कोणत्या देशात सोन्याचा सर्वात मोठा साठा आहे?

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 मार्च : सोन्याचा साठा (Gold Reserves) हा प्रत्येक देशाची महत्त्वाची संपत्ती असते कारण त्याचा वापर आर्थिक संकटाच्या वेळी संरक्षण करण्यासाठी केला जातो. यामुळेच प्रत्येक देशाच्या मध्यवर्ती बँकांमध्ये सोने म्हणजेच सोन्याचा साठा ठेवला जातो. सोन्याच्या साठ्यावर राजकीय बदल किंवा आर्थिक संकटांचा परिणाम होत नाही, म्हणूनच ते इतर कोणत्याही मालमत्तेपेक्षा अधिक आर्थिक स्थिरता प्रदान करतात. अमेरिकेकडे भारताच्या दहा पट जास्त जास्त सोनं आहे. तर सध्या जगातील शक्तीशाली देश म्हणून ज्या देशाची चर्चा सुरु आहे त्या रशियापेक्षाची अमेरिकेकडे पाच पट जास्त सोन्याचा साठा आहे. तर नव्याने आर्थिक महासत्ता म्हणून समोर येत असलेल्या चीनकडेही अमेरिकेपेक्षा अनेक पटींनी कमी सोन्याचा साठा आहे. GST दर रचनेत मोठा बदल होण्याची शक्यता, 12 आणि 18 टक्क्यांचा मिळून एकच 15 टक्क्यांचा स्लॅब येणार एखाद्या देशाकडे सोन्याचा साठा जितका जास्त तितका तो देश आर्थिकदृष्ट्या स्थिर मानला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की जगातील कोणत्या देशात सोन्याचा सर्वात मोठा साठा आहे? गोल्डहबच्या ताज्या अहवालानुसार, अमेरिकेत जगातील सर्वात जास्त सोन्याचा साठा आहे. जगातील सर्वात जास्त सोन्याचा साठा असलेले टॉप-10 देश कोणते आहेत आणि त्यांच्याकडे किती सोने आहे? याबद्दल माहिती घेऊया. PM Awas Yojna मधील नियमांत बदल, योजनेअंतर्गत मिळालेल्या घरात पाच वर्षे राहणे बंधनकारक 10. नेदरलँड (Netherland) सोने साठा : 612.45 टन 9. भारत (India) सोन्याचा साठा: 743.83 टन 8. जपान (Japan) सोने साठा : 845.97 टन 7. स्वित्झर्लंड (Switzerland) सोन्याचा साठा : 1,040 टन 6. चीन (China) सोन्याचा साठा: 1,948.31 टन 5. रशिया (Russia) सोन्याचा साठा: 2,298.53 टन 4. फ्रान्स (France) सोन्याचा साठा: 2,436.35 टन 3. इटली (Italy) सोन्याचा साठा: 2,451.84 टन 2. जर्मनी (Germany) सोन्याचा साठा: 3359.09 टन 1. अमेरिका (America) सोन्याचा साठा : 8133.47 टन

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या