JOIN US
मराठी बातम्या / मनी / कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये घसरण, तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे वाचा दर

कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये घसरण, तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे वाचा दर

कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या, तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलवर काय झाला परिणाम वाचा

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये चढ उतार पाहायला मिळत आहेत. डॉलरचं मूल्य वाढत असल्याने त्याचा परिणाम देखील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर पाहायला मिळत आहे. ग्लोबल मार्केटमध्ये बुधवारी ब्रेंट क्रूडचे दर घसरून 93.79 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. WTI प्रति बॅरल 88.66 डॉलरवर पोहोचला आहे. इथे देशातील सरकारी तेल कंपन्यांनी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले. त्यामुळे काही राज्यांमध्ये किमती वाढल्या आहेत. त्याचा परिणाम भारतात दिसला. काही राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती बदलल्या आहेत उत्तर प्रदेशात इंधनात 41 पैशांनी वाढ झाली आहे. पेट्रोल 0.41 रुपयांनी वाढून 96.71 रुपये प्रति लिटर तर डिझेल 0.40 रुपयांनी वाढून 89.87 रुपये लिटरवर पोहोचलं आहे. राजस्थानमध्येही किंमती बदलल्या आहेत. आता पेट्रोल 0.15 रुपयांनी वाढून 108.69 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 0.14 रुपयांनी वाढून 93.92 रुपये झाले आहे. पंजाब, ओडिशा आणि उत्तराखंडमध्ये किमतीत किरकोळ वाढ झाली आहे. इथे तेलंगणामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 40 पैशांनी घट झाली आहे. दिलासादायक बाबा म्हणजे महत्त्वाच्या चार महानगरांमध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार महानगरांमध्ये किमतीत कोणताही बदल झालेला नाही. कार घेणंही अवाक्याबाहेर होणार; येत्या काळात किंमती गगनाला भिडणार? दिल्लीमध्ये लिटरमागे लोकांना 96.72 रुपये तर डिझेलसाठी 89.62 रुपये मोजावे लागत आहेत मुंबईमध्ये लिटरमागे लोकांना 106.31 रुपये तर डिझेलसाठी 94.27 रुपये मोजावे लागत आहेत कोलकातामध्ये लिटरमागे लोकांना 106.03 रुपये तर डिझेलसाठी 92.76 रुपये मोजावे लागत आहेत चेन्नईमध्ये लिटरमागे लोकांना 102.63 रुपये तर डिझेलसाठी 94.24 रुपये मोजावे लागत आहेत रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर बदलतात. त्यावर एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन, वॅट यासोबत अन्य काही टॅक्सचा समावेश केल्यानंतरचे दर तुम्हाला दिसतात. त्यामुळे पेट्रोल डिझेलची किंमत वाढते. ऐन सणासुदीच्या काळात पेट्रोल-डिझेल महाग झाल्याने चिंता वाढली आहे. शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार, या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे

पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर तुम्हाला SMS द्वारेही मिळू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 क्रमांकावर आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत शोधू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या