JOIN US
मराठी बातम्या / मनी / Gold Price: सोमवारी वाढ झाल्यानंतर आज सोन्याचांदीच्या दरात घसरण, इथे तपासा नवे दर

Gold Price: सोमवारी वाढ झाल्यानंतर आज सोन्याचांदीच्या दरात घसरण, इथे तपासा नवे दर

Gold Price Today, 13 October 2020: सोन्याचांदीचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात सोने 133 रुपये तर चांदी 875 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. त्याचप्रमाणे जगभरातील शेअर बाजारात तेजी परतली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती उतरल्या आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात प्रति तोळा सोन्याची किंमत कमी होऊन 52 हजारांच्या खाली आली आहे. या दरम्यान चांदीचे दर 875 रुपयांनी उतरले आहेत. तज्ज्ञांच्या मते, दिवाळीपर्यंत सोनं एकाच रेंजमध्ये राहू शकते. जर आपण वरच्या स्तराबद्दल बोललो तर ते प्रति दहा ग्रॅम 51,500 ते 52800 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. त्याच वेळी, त्याची किंमत दर दहा ग्रॅम 49,800 पर्यंत घसरण्याची शक्यता आहे. सोन्याचे नवे दर (Gold Price, 13th October 2020) एचडीएफसी सिक्योरिटीजच्या मते दिल्लीतील सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर प्रति तोळा 133 रुपयांनी कमी झाले आहेत. यांनंतर आजचे नवे दर 51,989 रुपये प्रति तोळा आहेत. याआधी सोमवारी प्रति तोळा 52,122 रुपयांवर सोन्याची ट्रेडिंग बंद झाली होती. 5374 रुपयांनी स्वस्त झाले आहे सोने मंगळवारी कमोडिटी एक्सचेंज एमसीएक्सवर सोन्याचांदीच्या दरात घसरण झाली आहे. MCX वर आज सुरुवातीच्या सत्रात डिसेंबरच्या डिलीव्हरीचे सोने 0.55 टक्क्यांने कमी होत 50826 रुपयांवर पोहोचले आहे. (हे वाचा- SBI च्या 42 कोटी ग्राहकांसाठी मोठी बातमी! काही तासापासून ऑनलाइन बँकिंग सेवा ठप्प ) तर चांदीमध्ये 1.2 टक्क्यांची घसरण होऊन चांदी 62,343 रुपयांवर पोहोचली आहे. सर्वोच्च स्तरावरून सोन्याचे दर 5374 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत. चांदीचे नवे दर (Silver Price, 13th October 2020) मंगळवारी चांदीचे दरही कमी झाले आहेत. चांदीची किंमत 875 रुपये प्रति किलोने कमी झाली आहे. यानंतर चांदीचे दर प्रति किलो 63,860 रुपयांवर पोहोचले आहेत. सोमवारी चांदीचे ट्रेडिंग 64,735 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाले होते. आता पुढे काय होणार? तज्ज्ञांच्या मते अमेरिकन स्टिम्यूलस पॅकेजबाबत अनिश्चितता जारी आहे. त्यामुळे सध्या व्यापाऱ्यांची नजर ब्रिटनच्या व्यापार करारावर आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युरोपिय संघ व्यापार कराराचा आराखडा तयार करण्यासाठी गुरुवारपर्यंत कालावधी निश्चित केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या