मुंबई, 11 सप्टेंबर : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर. आज सोन्या-चांदीचे दर कमी झालेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आणि घरगुती मागणी कमी झाल्यानं सोन्याच्या किमतीत घट झालीय. आज दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 38, 975 रुपये झालीय. तर चांदी 1,150 रुपयापर्यंत स्वस्त झालीय. सोनं काही दिवसांपूर्वी महाग झाल्यानं सोन्याची मागणी कमी झालीय. म्हणून ही घसरण झालीय. सोन्याचा नवा भाव दिल्लीत 99.9 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 372 रुपयांनी कमी होऊन 38,975 रुपये प्रति 10 ग्रॅम झालीय. चांदी 1,150 रुपयांनी कमी होऊन 48,590 रुपये प्रति ग्रॅम झालीय. ‘हा’ व्यवसाय सुरू करणाऱ्यांना सरकार देईल अर्ध्यापेक्षा जास्त पैसे सोमवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 39,347 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. चांदी 49,740 रुपये प्रति किलोग्रॅम होती. काल मोहरममुळे सराफा बाजार बंद होता. आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयाॅर्कमध्ये सोनं 1,490 डाॅलर्स प्रति औंस आणि चांदी 18.10 डाॅलर्स प्रति औंस आहे. SBI च्या ग्राहकांसाठी खूशखबर! 1 ऑक्टोबरपासून मोफत होतील बँकेच्या ‘या’ सेवा तुम्हाला गोल्ड बाॅण्ड खरेदी करायचेत? सरकारी गोल्ड बाॅण्डची नवी सीरिज सोमवार 9 सप्टेंबरपासून सुरू झालीय. 9 ते 13 सप्टेंबरपर्यंत हे गोल्ड बाॅण्ड तुम्ही खरेदी करू शकता. याची किंमत 3,890 रुपये प्रति ग्रॅम आहे. जे गुंतवणूकदार ऑनलाइन अर्ज करतील, डिजिटल पेमेंट करतील त्यांना इश्यू प्राइझ 50 रुपये प्रति ग्रॅम सूट देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. आरबीआयनं सांगितलं, ‘अशा गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बाॅण्डचं इश्यू प्राइज 3,840 रुपये प्रति ग्रॅम आहे.’ पाकिस्तानात हाहाकार! दूध झालं पेट्रोलपेक्षा महाग, किंमत ऐकून व्हाल थक्क साॅवरेन गोल्ड बाॅण्डची सुरुवात नोव्हेंबर 2015मध्ये झाली होती. सोन्याचे दागिने खरेदी करणं कमी व्हावं आणि सोन्याच्या खरेदीचा उपयोग बचतीसाठी व्हावा म्हणून हा बाॅण्ड सुरू झाला. सोनं खरेदी करून घरात ठेवण्यापेक्षा बाॅण्ड घेतला तर करही वाचतो. …म्हणून भाजपात प्रवेश केला, हर्षवर्धन पाटलांचं UNCUT भाषण