JOIN US
मराठी बातम्या / मनी / आजपासून बदलले बँकिंगसह हे 6 नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

आजपासून बदलले बँकिंगसह हे 6 नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

गॅस सिलेंडरच्या (Gas Cylinder) किमतींपासून ते बँकिंग नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. 1 सप्टेंबर 2022 पासून कोणते बदल झाले आहेत आणि त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होईल जाणून घ्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 01 सप्टेंबर : आज सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून सहा मोठे नियम बदलण्यात आले आहेत. या नियमांच्या तुमच्या दैनंदिन जीवनावर आणि खिशावर परिणाम होईल. गॅस सिलेंडरच्या (Gas Cylinder) किमतींपासून ते बँकिंग नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. 1 सप्टेंबर 2022 पासून कोणते बदल झाले आहेत आणि त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होईल जाणून घ्या. याबाबतचं वृत्त ‘आज तक’ ने दिलं आहे. 1. एलपीजीच्या किमतीत कपात पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या (LPG) किमतीत बदल करून ते जाहीर करतात. दरवेळी किमती वाढत असताना या वेळी मात्र कंपन्यांनी ग्राहकांना दिलासा दिला आहे. एलपीजीच्या दरात 100 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ही कपात करण्यात आली आहे. 1 सप्टेंबर 2022 पासून दिल्लीत इंडेनच्या 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरची किंमत 91.50 रुपयांनी, कोलकात्यात 100 रुपयांनी, मुंबईत 92.50 रुपयांनी, चेन्नईमध्ये 96 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी खुशखबर! LPG सिलेंडरच्या किमतीत मोठी घट, पाहा नवे दर 2. NPS च्या नियमांमध्ये मोठे बदल 1 सप्टेंबरपासून आणखी एक मोठा बदल राष्ट्रीय पेन्शन योजनेत करण्यात आला आहे. आजपासून NPS खातं उघडल्यावर पॉइंट ऑफ प्रेझेन्सवर (POP) कमिशन दिलं जाईल. 1 सप्टेंबर 2022 पासून हे कमिशन 10 ते 15,000 रुपयांपर्यंत असेल. 3. इन्शुरन्स एंजच्या कमिशनमध्ये कपात IRDAI ने जनरल इन्शुरन्सच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. आता इन्शुरन्स एजंटला (Insurance Agent) 30 ते 35 टक्क्यांऐवजी केवळ 20 टक्के कमिशन मिळणार आहे. दुसरीकडे, लोकांच्या प्रीमियमच्या रकमेत कपात होणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. कमिशन बदलाचा नियम 15 सप्टेंबर 2022 पासून लागू होईल. 4. PNB KYC अपडेट्सची मुदत संपली पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) आपल्या ग्राहकांना बऱ्याच काळापासून KYC (Know Your Customers) अपडेट करण्यास सांगत आहे. केवायसी अपडेट करण्याची अंतिम मुदत आज संपली आहे. हे काम 31 ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण करण्याची मुदत बँकेने दिली होती. ग्राहकांनी केवायसी अपडेट केले नाही तर खात्यातून पैशांचे व्यवहार करण्यात अडचणी येऊ शकतात, असं बँकेने स्पष्ट केलंय. दरम्यान, तुम्ही केवायसी अपडेट केलं नसेल, तर बँकेच्या शाखेशी संपर्क करा. Petrol Diesel Prices : महागाईत दिलासा! ‘या’ शहरात पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात, वाचा आजचे दर 5. टोल टॅक्सवर द्यावे लागतील जास्त पैसे तुम्ही यमुना एक्सप्रेसवेने दिल्लीला ये-जा करत असाल किंवा प्रवासासाठी हा मार्ग वापरत असाल तर आजपासून तुम्हाला जास्त टोल टॅक्स भरावा लागेल. 1 सप्टेंबरपासून लागू झालेल्या नवीन दरवाढीनुसार, कार, जीप, व्हॅन आणि इतर हलक्या मोटार वाहनांसाठी टोल टॅक्सचा दर 2.50 रुपये प्रतिकिमीवरून 2.65 प्रतिकिमी करण्यात आला आहे. म्हणजेच यामध्ये प्रतिकिलोमीटर 10 पैशांची वाढ झाली आहे. हलकी कमर्शियल वाहनं, हलकी मालवाहू वाहनं किंवा मिनीबससाठी टोल टॅक्स 3.90 रुपये प्रतिकिमीवरून 4.15 रुपये प्रतिकिमी करण्यात आला आहे. बस किंवा ट्रकचा टोल दर 7.90 रुपये प्रतिकिमीवरून 8.45 रुपये प्रतिकिमी करण्यात आला आहे. या पूर्वी यमुना एक्स्प्रेस वेच्या टोल टॅक्समध्ये 2021 साली वाढ करण्यात आली होती. 6. गाझियाबादमध्ये सर्कलचे दर वाढले तुम्ही गाझियाबादमध्ये प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सप्टेंबर महिन्यापासून तुमचं बजेट बिघडू शकतं. इथे जमीन खरेदी करण्यासाठी तुम्हाला आजपासून जास्त पैसे मोजावे लागतील. गाझियाबादमध्ये सर्कल रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. आज सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून या सहा नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या