JOIN US
मराठी बातम्या / मनी / तुम्हाला माहित आहे का की किती महत्त्वाचे आहेत क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमधील हे डिटेल्स? गडबड झाल्यास त्वरित येईल लक्षात

तुम्हाला माहित आहे का की किती महत्त्वाचे आहेत क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमधील हे डिटेल्स? गडबड झाल्यास त्वरित येईल लक्षात

क्रेडिट कार्ड स्टेटमेंटच्या माध्यमातून ग्राहक त्यांच्या क्रेडिट कार्ड बिलमध्ये कोणतीही गडबड झाल्यास त्याकडे नजर ठेवू शकतात. जाणून घ्या ही माहिती वाचणं किती फायद्याचं आहे..

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 23 जानेवारी: आजकाल क्रेडिट कार्ड (Credit Card) हे अनेकांच्या आयुष्यातील महत्त्वाचा हिस्सा बनला आहे. या क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट देखील तितकेच महत्त्वाचे आहे. यामध्ये तुम्ही केलेलं पेमेंट, खरेदी, क्रेडिट बॅलन्स, रिवॉर्ड पॉइंट या सर्वाची माहिती असते. क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट मासिक असते आणि कार्डच्या बिलिंग सायकलच्या शेवटी ते जनरेट होते. दरम्यान त्या कालावधीसाठी कोणतेही स्टेटमेंट जारी करता येत नाही ज्या दरम्यान कोणताही व्यवहार किंवा थकीत रक्कम नाही आहे. तुम्हाला क्रेडिट कार्ड स्टेटमेंटवरील सर्व माहिती वाचणं आवश्यक आहे. स्टेटमेंटमध्ये असते ही माहिती क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये विविध माहिती उपलब्ध असते. क्रेडिट कार्ड स्टेटमेंटच्या माध्यमातून ग्राहक त्यांच्या क्रेडिट कार्ड बिलमध्ये कोणतीही गडबड झाल्यास त्याकडे नजर ठेवू शकतात. क्रेडिट कार्ड स्टेटमेंट वाचल्यानंतर तुम्हाला संशयास्पद व्यवहारांबद्दल देखील माहिती मिळू शकते. (हे वाचा- PNB ग्राहक असाल तर लक्ष द्या! फेब्रुवारीपासून या ATM मधून काढता येणार नाहीत पैसे ) खर्चांवर ठेवू शकता नियंत्रण तुम्ही जर क्रेडिट कार्ड स्टेटमेंट नियमित वाचत असाल तर तुम्हाला तुमचा खर्च नेमका काय आहे, हे ध्यानात येईल. त्यामुळे तुम्ही तुमचा खर्च सुनिश्चित करू शकता. शिवाय क्रेडिट स्कोअर देखील व्यवस्थित ठेवता येईल. अशाप्रकारे समजून घ्या क्रेडिट कार्ड स्टेटमेंट पेमेंट ड्यू डेट- ही क्रेडिट कार्ड पेमेंटची शेवटची तारीख आहे. या तारखेनंतर केलेल्या पेमेंटवर दोनप्रकारचे शुल्क द्यावे लागते. शिल्लक रकमेवर तुम्हाला व्याज द्यावे लागते आणि दुसरं म्हणजे लेट फीज देखील द्यावी लागते. मिनिमम अमाउंट ड्यू- ही रक्कम शिल्लक रकमेच्या काही टक्के असते (जवळपास 5 टक्के), लेट फीज वाचवण्यासाठी तुम्हाला ही रक्कम द्यावी लागते (हे वाचा- Home Loan: ही बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, वाचा किती आहे व्याजदर ) टोटल आउटस्टँडिंग- तुम्हाला दरमहिना एकूण थकित रकमेचे पेमेंट करणे गरजेचे आहे, ज्यामुळे कोणतेही अतिरिक्त शुल्क तुम्हाला द्यावे लागणार नाही. एकूण रकमेमध्ये सर्व EMI समाविष्ट असतात, ज्यामध्ये बिलिंग सायकलमध्ये लावण्यात आलेले सर्व चार्जेस देखील असतात. ग्रेस पीरियड- पैसे भरण्याची ड्यू डेट निघून गेल्यानंतर 3 दिवसांचा ग्रेस पीरियड दिला जातो. ग्रेस पीरियडमध्येही पैसे न भरल्यास पेनल्टी आकारली जाते. क्रेडिट लिमिट- क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये तुम्हाला तीन प्रकारची लिमिट दिसेल- एकूण क्रेडिट लिमिट, उपलब्ध क्रेडिट लिमिट, कॅश लिमिट

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या