3 वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज कुठं मिळेल? वाचा तुमच्या प्रश्नाचं सोपं उत्तर
मुंबई, 13 नोव्हेंबर: बँकांनी अलीकडेच मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) मे 2022 नंतर वारंवार रेपो दरात वाढ केल्यानंतर त्यांनी व्याजदरात वाढ केली आहे. RBI ने मे नंतर रेपो रेटमध्ये एकूण 190 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. अनेक बँका आता एफडीवर 7 टक्क्यांपेक्षा जास्त दरानं व्याज देत आहेत. जेथे किरकोळ चलनवाढीचा दर सप्टेंबर 2022 मध्ये 7.4 टक्क्यांच्या पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत फिक्स्ड डिपॉझिट हा अनेक लोकांसाठी गुंतवणुकीचा चांगला पर्याय असू शकतो. तुम्हीही येत्या काही दिवसांत फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तीन वर्षांच्या एफडीवर कोणत्या बँकांमध्ये सर्वोत्तम व्याजदर मिळेल, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एयू स्मॉल फायनान्स बँक- सध्या, या लघु वित्त बँकेत तीन वर्षांच्या कालावधीसह एफडीवर 7.50 टक्के व्याजदर उपलब्ध आहे. डीसीबी बँक- सध्या या खासगी बँकेत तीन वर्षांच्या एफडीवर 7.50 टक्के दराने व्याज मिळत आहे. बंधन बँक- या खाजगी बँकेत तुम्हाला सध्या तीन वर्षांच्या मुदत ठेवींवर 7 टक्के दराने व्याज मिळेल. हेही वाचा: गुडन्यूज! ‘या’ मोठ्या बँकेनं गृहकर्ज केलं स्वस्त, EMI झाला कमी, फक्त ‘या’ ग्राहकांना मिळणार फायदा सिटी युनियन बँक- या बँकेचा तीन वर्षांचा कालावधी असलेल्या FD वर 7 टक्के व्याजदर आहे. करूर वैश्य बँक- सध्या या बँकेत तीन वर्षांच्या मुदत ठेवींवर 7 टक्के दरानं व्याज मिळत आहे.
याशिवाय, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, आता तुम्ही घरी बसून पोस्ट ऑफिसमध्ये ऑनलाइन एफडी खाते उघडू शकता. यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याचीही गरज भासणार नाही. कारण बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिस देखील तुम्हाला एक वर्ष, दोन वर्षे, तीन वर्षे आणि पाच वर्षांसाठी मुदत ठेव योजनेची सुविधा देते. पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेवीला टाइम डिपॉझिट म्हणतात. पोस्ट ऑफिस मुदत ठेवींमध्ये वार्षिक आधारावर व्याज दिलं जातं, परंतु त्याची गणना तिमाही आधारावर केली जाते. तुम्ही पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये एका वर्षासाठी पैसे फिक्स केले तर तुम्हाला 5.50 टक्के दरानं व्याज दिले जाईल.