मुंबई : देशातील सर्वात मोठी IT सेवा देणारी कंपनी टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस TCS ने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांना तीन दिवल कंपल्सरी ऑफिसला यावं लागणार आहे. यामध्ये कोणतेही कारण चालणार नाही. कंपनीने याबाबत कर्मचाऱ्यांना मेल केला आहे. एका आठवड्यात कंपल्सरी तीन दिवस ऑफिसला येणं बंधनकारक असणार आहे. जे कर्मचारी नियमाचं पालन करणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना अधिक माहितीसाठी बिझनेस HR शी संपर्क करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मागच्या काही आठवड्यांपासून TCS आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येण्यासाठी प्रेरित करत आहे. ऑफिसमधून काम करण्याचे फायदेही सांगितले होते. २५ टक्के लोक ऑफिसमध्ये उपस्थित असतील तर उर्वरित घरून अशी योजना तयार करण्यात आली होती.
RBI कडून डिजिटल पेमेंट आणखी सुलभ! आता परदेशातूनही होणार सहज पेमेंट, 3 नवे उपक्रमविप्रोने ३०० कर्मचाऱ्यांना मूनलाईट प्रकरणात काढून टाकलं. विप्रोमध्ये कामाचे तास संपल्यानंतर हे कर्मचारी प्रतिस्पर्धी कंपनीमध्ये काम करत असल्याचं आढळून आलं आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वेत झोपण्याचा नियम बदलला, आता ही चूक करू नका
TCS च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पुढील तीन वर्षांत कंपनीच्या कार्यालयात आमचे 25 टक्के कर्मचारी काम करतील अशी योजना आखत आहोत आणि कोणत्याही व्यक्तीला कंपनीच्या कार्यालयात 25 टक्क्यांहून अधिक वेळ पूर्णपणे उत्पादक होण्यासाठी घालवावा लागणार नाही. विश्वास आहे की हा अधिक संतुलित दृष्टीकोन आहे आणि कर्मचार्यांना फायदा होईल.