JOIN US
मराठी बातम्या / मनी / सर्वात जास्त पगार घेणारे CEO राजेश गोपीनाथन यांनी TCS ला ठोकला रामराम, राजीनाम्याने खळबळ

सर्वात जास्त पगार घेणारे CEO राजेश गोपीनाथन यांनी TCS ला ठोकला रामराम, राजीनाम्याने खळबळ

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 मार्च : सर्वात जास्त पगार घेणारे सीईओ म्हणून ओळख असलेले टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन यांनी राजीनामा दिल्याची बातमी समोर आली आहे. गोपीनाथ यांचा कार्यकाळ 15 सप्टेंबर 2023 ला संपणार होता पण त्याआधीच त्यांनी राजीनामा दिला आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ‘गेली २५ वर्षे राजेशसोबत काम करत आहे. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला आहे. गेल्या ६ वर्षांत राजेशने भक्कम नेतृत्व दिले आहे अशी प्रतिक्रिया गोपीनाथन यांच्या राजीनाम्यावर टीसीएसचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी दिली.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी के कीर्तीवासन यांची 16 मार्चपासून नवीन एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोण आहेत गोपीनाथन? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अहमदाबाद येथून व्यवस्थापनामध्ये त्यांनी पदव्युत्तर पदविका घेतली. गोपीनाथ 2001 पासून TCS शी संबंधित होते. त्यांना फेब्रुवारी 2013 मध्ये कंपनीचे सीईओ पद बहाल करण्यात आले होते. त्यांनी आरईसी त्रिचूरपल्ली येथून इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीची पदवी घेतली होती. (चांगल्या पगाराची नोकरी सोडून उभारला बिझनेस, आता वर्षाकाठी 40 कोटींचा टर्नओव्हर!) 14 लाख कोटींची कंपनी सांभाळणारे सौरभ अग्रवाल कोण? टाटा सन्सचे सीएफओ सौरभ अग्रवाल यांना आधुनिक भांडवली बाजाराचे चाणक्य म्हटले तर वावगे ठरणार नाही. कठिणातील कठीण कॉर्पोरेट डील पूर्ण केलेल्या सौरभला देशातील सर्वात मोठे विलीनीकरण पूर्ण करण्याचे श्रेयही जाते. अब्ज डॉलर कंपनी व्होडाफोन आणि आयडिया यांना एकत्र करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. टाटा समूहात चेअरमन एन रामचंद्रन यांच्यानंतर त्यांचे सर्वोच्च स्थान आहे. त्यांचा पगारच त्यांच्या मेहनतीविषयी सर्व सांगून जातो. सौरभने यापूर्वी स्टँडर्ड चार्टर्ड बँक आणि डीएसपी मेरिल लिंच यांसारख्या मोठ्या समूहांमध्ये काम केलेय. ( 5 वर्षात मालामाल व्हायचंय? पोस्ट ऑफिसची ‘ही’ स्किम आहे बेस्ट ) सौरभ अग्रवाल यांना दोन दशकांहून अधिकचा इन्व्हेस्टमेंट बँकिंग अनुभव आहे. टाटा सन्समध्ये सामील होण्यापूर्वी ते आदित्य बिर्ला ग्रुपमध्ये कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीचे प्रमुख होते. आदित्य बिर्ला नुवोको लिमिटेड आणि ग्रासिम लिमिटेड यांची चरिंग करण्याचे श्रेय देखील त्यांनाच जाते. 2014 मध्ये ज्यावेळी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा IPO आला तेव्हा अग्रवाल त्याचे सल्लागार होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या