एक छोटाशा कल्पना अन् फक्त 295 रुपयांमध्ये सुरु झाली 1 लाख कोटींची कंपनी, वाचा सविस्तर
मुंबई, 10 डिसेंबर: एका छोट्याशा दुकानातून सुरू झालेला व्यवसाय आज हजारो कोटींचा झाला आहे. देशातच नव्हे तर संपूर्ण जगात बिस्किटांसह इतर खाद्यपदार्थांच्या व्यवसायातही या कंपनीचा दबदबा आहे. होय, आम्ही बोलत आहोत, खाद्य क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी ब्रिटानियाबद्दल… वाचून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल, पण स्वातंत्र्यापूर्वी 1892 मध्ये केवळ 295 रुपयांच्या गुंतवणुकीनं या कंपनीची सुरूवात झाली होती. वाडिया कुटुंबीयांच्या हाती कमांड- कोलकातामधील ब्रिटानियाचा व्यवसाय दुसऱ्या महायुद्धात झपाट्यानं वाढला आणि आज जवळपास प्रत्येक घरात कंपनीची बिस्किटे, टोस्ट, ब्रेड किंवा केक आणि इतर उत्पादनं सापडतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार ही कंपनी ब्रिटीश व्यावसायिकांनीच सुरू केली होती. सध्या या व्यवसायात वाडिया कुटुंबाचा मोठा वाटा आहे. एका छोट्या घरात बिस्किटे बनवून ही कंपनी सुरू झाली होती. हेही वाचा: शॉर्ट टर्म FDवर ‘या’ बँका देतात सर्वाधिक व्याजदर? वाचा डिटेल्स पहिला कारखाना 1924 मध्ये सुरू झाला- वर्षानुवर्षे हा व्यवसाय असाच सुरू राहिला, पण 1910 मध्ये इलेक्ट्रिक मशिनच्या मदतीनं बिस्किटे बनवायला सुरुवात झाली. 1921 मध्ये उत्पादन वाढवण्यासाठी कंपनीनं इंडस्ट्रियल गॅस ओव्हन आयात करण्यास सुरुवात केली आणि जसजसा व्यवसाय वाढत गेला तसतसा 1924 मध्ये मुंबईत कारखाना सुरू झाला. उत्पादन आणि मागणी या दोन्हीत वाढ झाल्यामुळे ब्रिटानिया बिस्किटची बाजारपेठ वाढू लागली आणि त्यानंतर कंपनीची लोकप्रियताही वाढली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कंपनीच्या बिस्किटांच्या मागणीत जोरदार वाढ झाली होती. दुसऱ्या महायुद्धात जबरदस्त व्यवसाय- दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटानियाला भारताला तसेच मित्र राष्ट्रांना बिस्किटांचा पुरवठा करण्यासाठी मोठी ऑर्डर मिळाली होती. यानंतर ब्रिटानियाची विक्री प्रचंड पोहोचली. देश स्वतंत्र झाल्यानंतर कंपनीनं आपला व्यवसाय वाढवला आणि बिस्किटांव्यतिरिक्त स्लाईस आणि रॅप्ड ब्रेड बनवायला सुरुवात केली. 1955 पर्यंत, ब्रिटानियानं बिस्किटांचा दुसरा ब्रँड, बोर्बन लाँच केला आणि ते प्रसिद्ध झाल्यानंतर 1963 मध्ये ब्रिटानिया केकची बाजारात जोरदार एन्ट्री झाली. हजारो लोकांना रोजगार दिला- व्यवसायात सतत वाढ होत असताना 3 ऑक्टोबर 1979 रोजी कंपनी ब्रिटानिया बिस्किट कंपनी लिमिटेड वरून ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये बदलली. आज, ब्रिटानियाचा व्यवसाय जगभर पसरला आहे आणि फोर्ब्सच्या मते, 2022 पर्यंत, 295 रुपयांपासून सुरू होणारी ब्रिटानिया 370 दशलक्ष डॉलर संपत्ती असलेली कंपनी बनली आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 1.07 लाख कोटी रुपये आहे. सध्या कंपनीची धुरा अध्यक्ष नुस्ली वाडिया यांच्या हातात आहे. 31 मार्च 2019 च्या आकडेवारीनुसार, या कंपनीत सुमारे 4,480 लोकांना रोजगार मिळाला आहे. ब्रिटानियाच्या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे -
ब्रिटानिया इंडस्ट्रीजचा 60 देशांमध्ये व्यवसाय- आज ब्रिटानिया इंडस्ट्रीजचा व्यवसाय जगातील 60 हून अधिक देशांमध्ये पसरलेला आहे. कंपनीची उत्पादने उत्तर अमेरिका, युरोप, आफ्रिका आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये निर्यात केली जातात. कंपनीचा दुग्ध व्यवसायही सातत्याने वाढत आहे आणि एकूण महसुलात त्याचा वाटा 5% आहे. कंपनीचे भारतात 50 लाखांहून अधिक रिटेल आउटलेट्स आहेत. ब्रिटानियाचे भारतात 13 कारखाने - ब्रिटानियाचे भारतात 13 कारखाने आहेत. कंपनीचा वार्षिक महसूल 9000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मंगळवारच्या शेअर बाजारात दिवसभराच्या व्यवहाराअखेर ब्रिटानिया शेअरची किंमत सुमारे 80,319.94 कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह 0.56 टक्क्यांनी वाढून 4,427.80 रुपयांवर बंद झाली. आज ही कंपनी केवळ बिस्किटेच नाही तर ब्रेडच्या बाबतीतही पुढे आहे, संघटित ब्रेड मार्केटमधला हा सर्वात मोठा ब्रँड आहे.